भारत संकल्प यात्रेचे सावरवाड येथे उत्स्फूर्त स्वागत
ग्रामस्थांना दिली केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती
ओटवणे प्रतिनिधी
भारत सरकारच्या ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत विकसित भारत संकल्प यात्रेचे सावरवाड ग्रामपंचायतीच्यावतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले..यावेळी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेले लाभार्थी तसेच ग्रामस्थ तसेच कर्मचारी उपस्थित होते. या संकल्प यात्रेचे स्वागत करण्यासाठी सावरवाड ग्रामपंचायतीने नियोजनासह जय्यत तयारी केली होती.
भारत सरकारच्या महत्वकांक्षी योजनांचे लाभ दुर्लक्षित घटकापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने गेल्या १५ नोव्हेंबर पासून या विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली आहे. या संकल्प यात्रेचा २६ जानेवारी २०२४ रोजी या विकसित भारत संकल्प यात्रेचा समारोप होणार आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाकडुन देण्यात येणार्या विविध योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
सावरवाड गावात या यात्रेचे माजी सभापती रवींद्र मडगावकर, सरपंच देवयानी पवार, उपसरपंच अनिकेत म्हाडगुत, ग्रामपंचायत सदस्य राजेश गोसावी, प्रशांत परब, रेषा तेली, विजया सावंत, सुवर्णा कुडरतकर, सरीता परब, सुनिता परब, भाजपा बुथ अध्यक्ष महेंद्र दळवी, दाजी कुडतरकर, रमेश कुडतरकर, गावातील बचत गटांचे सर्व प्रमुख, कृषी सहाय्यक छाया राऊळ, आरोग्य अधिकारी विद्या खरात, ग्रामसेविका मंदा खरात, कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी, सुवर्णा कुडरतकर, रेश्मा तेली, विजया सावंत सुनिता परब, आशा स्वयंसेविका, दत्ता वर्दंम, जया पवार आणि महिला वर्ग आदींनी स्वागत केले.