For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘दहशतवादाच्या प्रायोजकांचा भारतात हस्तक्षेप नको’

06:04 AM May 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘दहशतवादाच्या प्रायोजकांचा भारतात हस्तक्षेप नको’
Advertisement

पाकिस्तानच्या माजी मंत्र्याला केजरीवालांनी फटकारले

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सहाव्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच अरविंद केजरीवाल यांनी पाकिस्तानच्या एका माजी मंत्र्याला सोशल मीडियावरून फटकारले आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे जाहीर समर्थन केले. पण केजरीवाल यांच्या एका पोस्टने पाकिस्तानी मंत्र्याला गप्प केले. ‘पाकिस्तान हा दहशतवादाचा सर्वात मोठा प्रायोजक आहे,’ असे केजरीवाल यांनी थेट फवाद चौधरींना सुनावले. तसेच ‘पाकिस्तानची परिस्थिती खूपच वाईट आहे, तुम्ही तुमच्या देशाची काळजी घ्या.’ असा सल्लाही दिला.

Advertisement

पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारमध्ये मंत्री असलेले फवाद चौधरी यांनी केजरीवाल यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर कमेंट्स केली होती. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात शनिवारी दिल्लीतील सातही जागांवर मतदान होत असतानाच चौधरी यांनी सोशल मीडियावर केजरीवाल यांचा फोटो शेअर करत ‘केवळ शांतता-सद्भावनाच द्वेष आणि अतिरेकी शक्तींचा पराभव करेल.’ अशी टिप्पणी केली होती. फवाद चौधरींच्या या पोस्टवर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्यांना ‘चौधरी साहेब, मी आणि माझ्या देशाचे लोक आमचे प्रश्न हाताळण्यास पूर्णपणे सक्षम आहोत. तुमच्या पोस्टची गरज नाही. सध्या पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तुम्ही तुमच्या देशाची काळजी घ्या’ असे खडे बोल सुनावले. ‘भारतात होत असलेल्या निवडणुका ही आमची अंतर्गत बाब आहे. दहशतवादाच्या सर्वात मोठ्या प्रायोजकांचा हस्तक्षेप भारत खपवून घेणार नाही’ असेही केजरीवाल यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

Advertisement
Tags :

.