For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चव्हाट गल्ली मराठी शाळेत स्पोकन इंग्लीश-संगणक वर्ग

10:29 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
चव्हाट गल्ली मराठी शाळेत स्पोकन इंग्लीश संगणक वर्ग
Advertisement

बेळगाव : विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये आत्मसात व्हावीत, तसेच त्यांना उच्चशिक्षण घेताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने चव्हाट गल्ली येथील मराठी प्राथमिक शाळा क्र. 5 येथे नवीन उपक्रम राबविण्यात आला आहे. शाळेतील पटसंख्या वाढीसाठी स्पोकन इंग्लीश तसेच कॉम्प्युटर शिक्षण देण्याचा अनोखा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. शाळा सुधारणा कमिटीच्या उपस्थितीत नुकताच या शाळेमध्ये प्रारंभोत्सव साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक, माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, दीपक किल्लेकर, श्रीकांत कडोलकर, रवी नाईक तसेच एसडीएमसीच्या अध्यक्षा तुपारे यांनी पटसंख्या वाढीसाठी सविस्तर चर्चा केली. दर्जेदार शिक्षणासाठी मुलांना अस्खलित इंग्रजी येणे गरजेचे आहे. यासाठीच स्पोकन इंग्लीश तसेच संगणक शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. दररोज सकाळी स्पोकन इंग्लीश व सायंकाळी संगणक प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे मुख्याध्यापक मुचंडीकर यांनी सांगितले. शाळेसाठी दोन नवे संगणक देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे किल्लेकर यांनी सांगितले. पटसंख्या वाढीसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. ए. माळी यांनी  केले. राजू कांबळे यांनी आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.