रत्नागिरीत उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेत फूट ?
03:19 PM Oct 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपाचे माझी आमदार बाळ माने यांनी नुकताच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेत प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यात उभाठा मधून विधानसभेसाठी जिल्ह्यात उत्सुक असलेले उदय बने आणि नवीन पक्ष प्रवेश केलेले बाळ माने या दोघांपैकी कुणाला उमेदवारी मिळणार असा प्रश्न होता. मात्र उभाठा कडून बाळ माने यांना उमेदवारी मिळाली आणि उदय बने मात्र नाराज झाले.
आता उभाठा मध्ये नाराजीच्या राजकारणास सुरुवात झाली आहे. उदय बने आता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक नाहरकत दाखले घेण्यासाठी बने जिल्हापरिदेत गेले होते. त्यांनी हे दाखले घेत अपक्ष उमेदवारी भरण्याची तयारी केली आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे उभाठा मधील नाराजी नाट्य रत्नगिरीच्या राजकारणात कोणते रंग उधळते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Advertisement
Advertisement