काँग्रेसमध्ये फूट, जुने नेते पडले एकाकी
प्रणव मुखर्जी यांच्या कन्येचे वक्तव्य : पक्षाला आत्मपरीक्षण करण्याची गरज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस पक्षात मूल्यात्मक घसरण झाली असून पक्षाला दुर्दैवी स्थितीवर आत्ममंथन करण्याची गरज आहे. अनेक जुने काँग्रेस कार्यकर्ते स्वत:ला पक्षात एकाकी मानत आहेत, कारण वरिष्ठ नेत्यांमध्ये विचारसरणीची कमतरता असल्याचे वक्तव्य माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा यांनी रविवारी केले आहे. माझ्या पित्याच्या निधनानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलाविण्यात आली नाही आणि कुठलाही प्रस्ताव संमत करण्यात आला नाही, यामुळे आम्ही दुखावलो गेलो असे शर्मिष्ठा यांनी नमूद केले.
माझ्या पित्याच्या बाबतीत हे जाणूनबुजून करण्यात आले होते का केवळ बेजबाबदारपणा होता हे माहित नाही. राहुल गांधी आणि त्यांच्या निकटवर्तीयांना काँग्रेसने पूर्वी अशाप्रसंगी कोणती पावले उचलली हेच माहित नाही. यामुळे ही काँग्रेसमधील एक गंभीर आणि दु:खद स्थिती असल्याचे शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या.
माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या बाबतीत काय करण्यात आले हे आम्ही विसरू नये. काँग्रेसची पूर्ण इकोसिस्टीम म्हणजेच सोशल मीडिया सातत्याने मला आणि माझ्या पित्याला काही अन्य मुद्द्यांवर सातत्याने ट्रोल करत होता. माझ्या पित्याबद्दल जी भाषा वापरण्यात आली ते पाहता काँग्रेसमध्ये खरोखरच फूट पडल्याचे स्पष्ट होते. काँग्रेसने सोशल मीडियावर ट्रोल करण्याऐवजी गंभीर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण माझ्याप्रमाणे काँग्रेसच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणारे लोक आता पक्षापासून दुरावल्याचा अनुभव घेत आहेत असे