For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

एसपीके महाविद्यालयाचे प्रा. वासुदेव बर्वे यांना पीएच.डी. पदवी प्रदान; कोकणातील प्राथमिक शिक्षकांच्या पेन्शन योजनांचा तुलनात्मक अभ्यास

12:44 PM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
एसपीके महाविद्यालयाचे प्रा  वासुदेव बर्वे यांना पीएच डी  पदवी प्रदान  कोकणातील प्राथमिक शिक्षकांच्या पेन्शन योजनांचा तुलनात्मक अभ्यास
Advertisement
सावंतवाडी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सावंतवाडी येथील एसपीके महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील प्राध्यापक वासुदेव गोविंद बर्वे यांना लेखांकन व लेखापरीक्षण (Accountancy and Auditing) या विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

प्रा. बर्वे यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत आपले संशोधन पूर्ण केले. त्यांच्या संशोधनाचा विषय महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या जुन्या व नवीन पेन्शन योजनांचा तुलनात्मक लेखांकनात्मक अभ्यास हा होता. या संशोधनात त्यांनी विशेषतः कोकण विभागातील प्राथमिक शिक्षकांच्या पेन्शन योजनांवर लक्ष केंद्रित केले.

Advertisement

पेन्शन योजनांशी संबंधित आर्थिक, लेखांकनविषयक आणि तुलनात्मक पैलूंचा अभ्यास त्यांच्या संशोधनातून मांडण्यात आला आहे. शिक्षकांच्या जुन्या आणि नवीन पेन्शन योजनांमधील आर्थिक बाबी समजून घेण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरते.

प्रा. वासुदेव बर्वे यांच्या या यशामुळे एसपीके महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Advertisement

Advertisement

.