For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सार्वजनिक ठिकाणी तंबाखुजन्य पदार्थ थुंकल्यास 1 हजाराचा दंड

10:54 AM May 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
सार्वजनिक ठिकाणी तंबाखुजन्य पदार्थ थुंकल्यास 1 हजाराचा दंड
Advertisement

बेंगळूर : सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, तंबाखुजन्य पदार्थ/गुटखा खावून थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राज्य सरकारने यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे यापुढे सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढल्यास आणि गुटखा/तंबाखू खावून थुंकल्यास 1,000 रुपये दंड ठोठावला जाणार आहे. राज्य सरकारने यासंबंधी तयार केलेल्या ‘सिगारेट आणि इतर तंबाखुजन्य उत्पादने जाहिरात, व्यापार उत्पादन, पुरवठा विनिमय दुरुस्ती विधेयक-2024’ ला राष्ट्रपतींनी 23 मे रोजी मंजुरी दिली होती. शुक्रवारी यासंबंधी सरकारने राजपत्रित अधिसूचना जारी केली. त्यानुसार 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना विडी-सिगारेट व तंबाखुजन्य उत्पादनांची विक्री करणे निषिद्ध आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांना 1 हजार रुपयांच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. उपाहारगृह, पब, बार-रेस्टॉरंटमध्ये हुक्का ओढण्यास संधी देण्यावरही या कायद्यान्वये बंदी आहे. याचे उल्लंघन केल्यास 50,000 रु. ते 1 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल.

Advertisement

Advertisement
Tags :

.