For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अध्यात्म महोत्सवात घडणार आध्यात्मिक वारशाचे दर्शन

04:25 PM Feb 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
अध्यात्म महोत्सवात घडणार आध्यात्मिक वारशाचे दर्शन
Advertisement

सांगे, पणजी, कळंगुट,कुंडईत अनेक सत्रांचे आयोजन: देशभरातून संत-महंत, मान्यवरांची उपस्थिती

Advertisement

पणजी  : श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर पद्मश्री विभूषित सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या दिव्य संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली ‘गोवा स्पिरिच्युअल फेस्टिव्हल 2026’ या भव्य-दिव्य महोत्सवाचे आयोजन सद्गुऊ फाउंडेशनद्वारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोवा सरकार यांच्या सहकार्याने दि. 19 ते 24 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले आहे. गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, सनातन अध्यात्मिक वारसा आणि गोमंतकीय अस्मितेचे जागतिक दर्शन घडविणारा हा फेस्टिव्हल अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.

नारीशक्तीच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या पर्वामुळे गोव्याचा आध्यात्मिक वारसा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक ठळकपणे अधोरेखित होईल. या ऐतिहासिक सोहळ्यास अनेक महामंडलेश्वर, संत, आध्यात्मिक गुऊ, जगद्गुरु शंकराचार्य, विविध पीठांचे पीठाधीश्वर, अखाड्यांचे संत-महंत तसेच शासकीय मान्यवर उपस्थित राहणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी आयोजन समितीच्या अध्यक्षा निलिमा मांद्रेकर, केंद्रीय पदाधिकारी - शुभक्षण नाईक, सुवर्णलता वायंगणकर, रामचंद्र नाईक, श्रीराज शेलार, सचिन गांवकर, वेदमूर्ती साईश परब, शिवानंद नाईक उपस्थित होते.

Advertisement

छत्रपतींच्या मूर्तीचे लोकार्पण

महोत्सवाची सुऊवात दि. 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4:30 वाजता संगमपूर, सांगे येथे होणार असून गोवा स्पिरिच्युअल फेस्टिव्हल तथा संगमपूर शिव साम्राज्य समितीच्या आयोजनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी श्री संगमेश्वर पूजन, संतांच्या उपस्थितीत महाआरती, कलश यात्रा व संत आशीर्वचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 ‘गोवा व्हिजन समिट’

दि. 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वा. पणजी येथे ‘गोवा व्हिजन समिट’ अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा व परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

 ‘रन फॉर स्पिरिच्युअॅलिटी’

दि. 21 फेब्रुवारी रोजी पहाटे 6:30 वा. कळंगुट समुद्रकिनारी संतपूजन, योगसाधना, सामुदायिक श्रीहनुमान चालीसा पठण, ‘रन फॉर  स्पिरिच्युअॅलिटी’ मॅरेथॉन तसेच संत सान्निध्यात पवित्र समुद्रस्नान आयोजित करण्यात आले आहे.

‘गजर गोमंतक’

दि. 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता भव्य समुद्र महाआरती, रथयात्रा, सामुदायिक श्रीमद् भगवद्गीता पठण, संतपूजन व पूज्य संतांचे आशीर्वचन, संगीत प्रस्तुती - ‘गजर गोमंतक’ असा दिव्य कार्यक्रम होणार आहे.

महादायी नदी पूजन

दि. 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता पणजी येथे स्पिरिच्युअल क्रूज अंतर्गत महादायी नदी पूजन, ‘संगीत सरिता’, सत्कार सोहळा व संत सान्निध्यात नौकाविहाराचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता तपोभूमी येथे गोमाता पूजन, देवस्थान व संत संमेलन, सद्गुरु भक्ती महायज्ञ व दिव्य ब्रह्मानुष्ठान सोहळ्याने ‘गोवा स्पिरिच्युअल फेस्टिव्हल 2026’ ची सांगता होणार आहे. या अद्वितीय आध्यात्मिक महोत्सवाच्या माध्यमातून गोमंतकाचे सांस्कृतिक व आध्यात्मिक वैभव जगविख्यात होणार आहे. या ऐतिहासिक महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांना आग्रहाचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.