For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तान - इंग्लंड सामन्यात फिरकीपटूंवर भार

06:55 AM Feb 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तान   इंग्लंड सामन्यात फिरकीपटूंवर भार
Advertisement

वृत्तसंस्था/ पल्लेकेले

Advertisement

पल्लेकेले येथे आज मंगळवारी होणाऱ्या टी-20 विश्वचषकातील सुपर एट सामन्यात इंग्लंड आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येतील तेव्हा त्यांच्या फिरकी गोलंदाजांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहतील. इंग्लंडने अद्याप टॉप गियर मिळवलेले नसले, तरी दोन वेळच्या विजेत्या संघाने विजयाचे मार्ग शोधले आहेत. त्यांनी श्रीलंकेवर 51 धावांनी विजय मिळवून सुपर एट मोहिमेची चांगली सुऊवात केली, ज्यामुळे त्यांचा नेट रन रेट लक्षणीयरीत्या वाढला आहे आणि त्यांना गुणतालिकेत अव्वल स्थानावर नेले आहे.

श्रीलंकेविऊद्ध माफक धावसंख्येचा बचाव करताना इंग्लंडने परिस्थितीनुसार उत्तम खेळ केला. त्यांच्या फिरकी गोलंदाजांनी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरसह श्रीलंकेचा नाट्यामय पराभव करण्यात मोलाचा वाटा उचलाला. लेगस्पिनर आदिल रशिद आणि डावखुरा फिरकी गोलंदाज लियाम डॉसन यांनी बळी मिळविण्याच्या बाबतीत चांगली साथ दिली आहे. दरम्यान, विल जॅक्स हा एक सामना जिंकणारा खेळाडू म्हणून उदयास आला आहे. त्याची ऑफस्पिन उपयुक्त ठरली आहे, शिवाय त्याने नेपाळविऊद्ध 39, स्कॉटलंडविऊद्ध 16 आणि इटलीविऊद्ध 53 धावा केल्या, ज्यामुळे इंग्लंडला अडचणीतून बाहेर येता आले.

Advertisement

सलामीवीर फिल साल्ट श्रीलंकेविऊद्ध सामना जिंकणारी खेळी करून फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने स्पर्धेत पहिल्यांदाच पॉवरप्लेच्या पलीकडे फलंदाजी केली आहे. तथापि, जोस बटलरचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. परंतु या अनुभवी फलंदाजाला त्याचा कर्णधार हॅरी ब्रूकचा पाठिंबा आहे, ज्याला स्वत:ला अद्याप सूर सापडलेला नाही. इंग्लंडला या ठिकाणाची चांगली ओळख आहे. त्यांनी या महिन्याच्या सुऊवातीला येथे तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-0 असा विजय मिळवला होता आणि श्रीलंकेविऊद्धचा सुपर एट सामनाही जिंकला.

दुसरीकडे, न्यूझीलंडविऊद्धचा सुपर एटचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर पाकिस्तान निराश झाला आहे, कारण त्यांना फक्त एक गुण मिळाला आणि चुकांसाठी फारशी जागा राहिलेली नाही. पाकिस्तान त्यांच्या फिरकी गोलंदाजांवर अवलंबून असेल. कारण ही खेळपट्टी नेहमी सामना जसजसा पुढे सरकत जातो तसतशी मंदावत जाते. उस्मान तारिकच्या गूढ फिरकीसोबत पाकिस्तानकडे सैम अयुब, अबरार अहमद, शादाब खान आणि मोहम्मद नवाज असे फिरकीपटू आहेत, जे इंग्लंडच्या फलंदाजीला रोखण्यात महत्त्वपूर्ण ठरू शकतात. तथापि, पाकिस्तानच्या फलंदाजीतील समस्या, विशेषत: दर्जेदार फिरकी माऱ्यासमोर सातत्याचा अभाव ही चिंतेची बाब आहे.

संघ

इंग्लंड : हॅरी ब्रुक (कर्णधार), टॉम बँटन, जोस बटलर, बेन डकेट, फिल सॉल्ट, जेकब बेथेल, सॅम करन, लियाम डॉसन, विल जॅक्स, जेमी ओव्हर्टन, रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, आदिल रशिद, जोश टंग, ल्युक वुड.

पाकिस्तान : सलमान अली आगा (कर्णधार), अब्रार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर झमान, ख्वाजा नरय, मोहम्मद नवाझ, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सइम आयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान, उस्मान तारिक.

वेळ : सायं. 7.00 वा.

Advertisement
Tags :

.