महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चीनमधील स्पायडर वुमन

06:39 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेफ्टी गियरशिवाय उंच पर्वतावर चढण्यास सक्षम

Advertisement

पर्वतांवर चढण्यासाठी अत्यंत अधिक प्रशिक्षण आणि सरावाची आवश्यकता असते. सुरक्षात्मक उपाय, देखरेख आणि सेफ्टी गियरसोबत लोक पर्वतावर चढत असतात. परंतु एक चिनी महिला 108 मीटर उंच शिखरावर कुठल्याही सेफ्टी गियरशिवाय चढण्याचे कौशल्य राखून आहे. ही चिनी महिला केवळ हातांच्या मदतीने सुमारे 30 मजली इमारतइतका उंच पर्वत सहजपणे चढू शकते. या अद्भूत कौशल्यामुळे या महिलेला ‘चायनीज स्पायडर वुमेन’ हे नाव मिळाले आहे. 43 वर्षीय लुओ डेंगपिनच्या या अद्भूत प्रतिभेमागे मृतांना पर्वतांवर दफ करण्याची प्राचीन मियाओ प्रथा देखील कारणीभूत आहे.

Advertisement

स्वत:च्या वडिलांच्या मार्गदर्शनात लुओ डेंगपिन वयाच्या 15 व्या वर्षापासून रॉक क्लायम्बिंगचा सराव करत आहे. सद्यकाळात  प्रारंभित काळात मुलांशी स्पर्धा करणे आणि उदरनिर्वाहासाठी वनौषधी जमा करणे हाच रॉक क्लायम्बिंग शिकण्यासाठी प्रमुख प्रेरणास्रोत होता. हे केवळ मुलांसाठी असल्याचे लोकांनी म्हटले होते. परंतु पुरुष आणि महिला समान असल्याचे माझे मानणे असल्याचे लुओने म्हटले आहे.

प्राचीन मियाओ प्रथा

केवळ हातांद्वारे उंच पर्वतांवर चढण्याच्या लुओ डेंगपिनच्या अदभूत कौशल्यामागे प्राचीन मियाओ प्रथा आहे. पारंपरिक स्वरुपात मियाओ लोक दुर्गम आणि पर्वतीय  भागांमध्ये राहायचे आणि मृतांना उंच ठिकाणी दफन करायचे. मृतांना उंच ठाकणी दफन केल्याने त्यांना स्वत:च्या पितृभूमीकडे पाहण्याची अनुमती मिळते अशी मान्यता मध्य चीनमध्ये आहे. कालौघात मियाओ लोक केवळ हातांच्या मदतीने पर्वतांवर चढण्याचे कौशल्य आत्मसात करत राहिले आहेत. वर्तमान काळात लुओने स्वत:च्या या कौशल्याला मनोरंजनात बदलले आहे. पर्यटक तिला कुठल्याही सेफ्टी गियरशिवाय पर्वतांवर चढून दाखविण्याची विनंती करतात आणि पैसेही देतात.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article