बेडकांना पाळणारा कोळी
निसर्गाने जगात अजब गोष्टी निर्माण केल्या आहेत. कोळी हा प्राणी अत्यंत छोटा असला तरीही तो अत्यंत धोकादायक असतो. जगात कोळ्याच्या 50 हजार प्रजाती आढळून येतात. यातील अनेक कोळी इतके मोठे असतात, जे विषारी सापालाही फस्त करत असतात. तर काही कोळ्यांच्या दंशांमुळे माणसांचा मृत्यूही होत असतो.
अशाच एका कोळ्याच्या प्रजातीचे नाव टेरेंटुला आहे. टेरेंटुला प्रजातीतही वेगवेगळ्या प्रकारचे कोळी असतात. याच्या एका प्रजातीच्या कोळ्याचा आकार सुमारे 12 इंचाचा असतो. या प्रजातीचे कोळी छोटे जीव म्हणजेच किडे, पाल आणि बेडुक खात असतात. स्वत:च्या दंशाद्वारे त्यांना हळूहळू बेशुद्ध करतात आणि मग त्यांना खात असतात.
टेरेंटुला प्रजातीचा कोळी छोट्या बेडकांना स्वत:चा पाळीव करून ठेवत असतो. जो बेडुक त्यांच्यासोबत राहतो, त्यांना ते कधीच खात नाहीत. प्रत्यक्षात हे कोळी आणि त्यांच्यासोबत राहणारे बेडुक परस्परांवर निर्भर असतात. टेरेंटुला बेडकांना सुरक्षा आणि राहण्यासाठी जागा देते. तर बेडुक बदल्यात कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या छोट्या किड्यांची सफाई करतो आणि जाळे साफ करण्याचे काम करतो. हे बेडुक किड्यांना नियंत्रित करण्याचे काम करतात आणि यामुळे टेरेंटुलच्या अंड्यांचे नुकसान होणे टळते.
परस्परांचा करतात बचाव
टेरेंटुला छोटे डॉटेड हमिंग फ्रॉग्सना स्वत:सोबत बाळगतात, जे मुंग्या आणि छोट्या किड्यांना खात असतात. याचबरोबर ते कोळ्यांच्या जाळ्याला सुरक्षित करण्याचे काम देखील करतात. तर टेरेंटुला बेडुकाचा साप अन् अर्वरित मोठ्या कोळ्यांपासून बचाव करतात. त्यांच्यासोबत राहणारे बेडुक हे टेरेंटुलाच्या शिकारीतून वाचलेले फस्त करत असतात.