For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘स्पायडर नोयर’चा ट्रेलर प्रदर्शित

06:48 AM May 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘स्पायडर नोयर’चा ट्रेलर प्रदर्शित
Advertisement

नवी सीरिज ‘स्पायडर नोयर’चा पहिला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ही सीरिज 1930 च्या दशकातील न्यूयॉर्क शहरावर आधारित एक डार्क आणि स्टायलिश मार्वल थ्रिलर आहे. ही 8 एपिसोड्सची सीरिज असून यात निकोलस केज ‘बेन राइली’च्या भूमिकेत दिसून येणार आहे. बेन राइली हा कधीकाळी शहराचा एकमेव सुपरहिरो असलेला प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते.

Advertisement

ही सीरिज ‘स्पायडर मॅन : नोयर’वर आधारित असून यात जुन्या काळातील डिटेक्टिव्ह स्टाइलला (नोयर टोन) खास स्वरुपात दाखविण्यात आले आहे. कहाणीत बेन राइलीचे खासगी आयुष्यही दाखविण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये ‘रुबी’ नावाच्या खास व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे जीवन बदलल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. तसेच केट हार्डीसोबतचे त्याचे नाते हळूहळू फुलत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. शहरात वाढते गुन्हे आणि धोकादायक शत्रूंशी लढण्यासाठी बेनला स्वत:च्या जुन्या सुपरहीरोच्या अवतारात पुन्हा यावे लागते. ट्रेलरमध्ये खलनायकही अत्यंत दमदार दाखविण्यात आला आहे. स्पायडर नोयर ही सीरिज 27 मे रोजी प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम केली जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.