स्पाइसजेट’चा तिमाही नफा 25 कोटींच्या घरात
मागील वर्षी एअरलाइनला 301 कोटी रुपयांचा तोटा
नवी दिल्ली :
भारतातील परवडणाऱ्या किंमतीत विमान प्रवास करवणारी कंपनी स्पाइसजेटने 2024-25 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 25 कोटी रुपयांचा नफा (एकत्रित निव्वळ नफा) कमावला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 301 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत स्पाइसजेटचा ऑपरेशन्समधून एकत्रित महसूल वर्षानुवर्षे 35.35 टक्के कमी होऊन 1,231 कोटी रुपयांवर आला. आर्थिक वर्ष 24 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 1,904 कोटी रुपये होता. त्रैमासिक आधारावर महसूलात 35 टक्के वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच जुलै-सप्टेंबरच्या तुलनेत कंपनीचा महसूल 35.12 टक्क्यांनी वाढला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 911 कोटी रुपयांचा महसूल मिळवला.
समभागाची कामगिरी
स्पाइसजेटचा शेअर्स 1.70 टक्के वाढीसह 47.97 वर बंद झाला, तिमाही निकालांच्या एक दिवस आधी. एअरलाइन कंपनीच्या समभागांनी मागील 5 दिवसांत 10.28 टक्के आणि एका महिन्यात 9.35 टक्के इतका परतावा दिला आहे. तर, दीर्घकालीन म्हणजे 6 महिन्यांत 28.03 टक्के आणि एका वर्षात 29.65 टक्के वाढले आहेत. स्पाइसजेटचे बाजारमूल्य 6150 कोटी रुपये आहे. स्पाइसजेट ही भारतातील विमान कंपनी आहे, जी देशाच्या कानाकोपऱ्यांना जोडते. कंपनी भारतातील 48 ठिकाणी आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणी दररोज सुमारे 250 उ•ाणे चालवते. स्पाइसजेटच्या ताफ्यात बोईंग 737 मॅक्स, बोईंग 700 आणि क्यू400 यांचा समावेश आहे.