स्पाइसजेटने बीबीएएमसोबतचा वाद मिटवला
नवी दिल्ली :
हवाई क्षेत्रातील कंपनी स्पाइसजेटने अलीकडेच बीबीएएमसोबत असलेला वाद पुर्णपणे मिटवला असल्याचे सांगितले जात आहे. सदरच्या बातमीने शेअरबाजारात समभाग बुधवारी वेगवान दौडताना दिसला.
स्पाइसजेटने बॅबकॉक अँड ब्राउन एअरक्राफ्ट मॅनेजमेंट (बीबीएएम) यांच्यासोबतचा 13 कोटी अमेरिकी डॉलर संबंधातील वाद आपापसात समझोता करुन मिटवला आहे. बुधवारी कंपनीने यासंबंधीची घोषणा केली. मागच्या महिन्यात याचदरम्यान स्पाइसजेटने क्युआयपी मार्फत 3 हजार कोटी रुपयांची उभारणी केली आहे. या उभारणीमुळे कंपनीची आर्थिक बाजु काहीशी मजबुत झाली असून देणेकऱ्यांची संख्या कमी होण्यास मदत झाली असल्याचे कंपनीने सांगितले आहे. येत्या काळात अधिकाधिक विमानांची संख्या वाढवण्यासोबत उत्तम सेवा देण्यासाठी कंपनी प्रयत्न करणार असल्याचे चेअरमन अजय सिंह यांनी सांगितले.
समभाग वधारला
याचदरम्यान सकाळी सदरची गुड न्यूज स्पाइसजेटने देताच कंपनीच्या समभागाने बुधवारी शेअरबाजारात मुसंडी मारली. कंपनीचा समभाग इंट्रा डे दरम्यान 9.45 टक्के वाढत 63 रुपयांवर पोहचला होता. कंपनी लवकरच 10 विमाने आपल्या ताफ्यात सामील करणार आहे असे समजते.