For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मसाला बनवणाऱ्या कंपनीचा येणार आयपीओ, 1000 कोटी उभारणार

06:29 AM May 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
मसाला बनवणाऱ्या कंपनीचा येणार आयपीओ  1000 कोटी उभारणार
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

इंदूरमधील मसाला बनवणारी कंपनी पुष्प ब्रँड (इंडिया) आपला सार्वजनिक प्रारंभिक प्रस्ताव (आयपीओ) लवकरच सादर करणार आहे. आयपीओअंतर्गत कंपनी 1 हजार कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. यासंदर्भातला सविस्तर अर्जसंबंधीत कागदपत्रे कंपनीने बाजारातील नियामक संस्था सेबी यांच्याकडे सादर केली आहेत. पॅकेजड मसाला बाजारात पुष्प ब्रँड यांची स्पर्धा बाजारातील एव्हरेस्ट, एमडीएच, बादशहा मसाला व शुभम गोल्डी मसाला यासारख्या कंपन्यांशी असणार आहे.

कंपनीने आयपीओअंतर्गतची कागदपत्रे सेबीकडे मंगळवारी जमा केली आहेत. आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेलअंतर्गत असेल. यामध्ये प्रवर्तक व गुंतवणूक समभागधारक मिळून 74.45 लाख इक्विटी समभाग विक्री करणार आहेत. यात प्रवर्तक महेंद कुमार सुराना व सुरेंद्र कुमार सुराना आपली हिस्सेदारी विकणार आहेत. तर गुंतवणूकदार ए91 इमर्जिंग फंड आयएलएलपी व सिक्स्थ सेन्स इंडिया अपॉरच्युनिटीज थ्री या कंपन्याही आपली हिस्सेदारी विक्री करतील. आयपीओ ऑफर फॉर सेल असल्याने आयपीओतून मिळणारी रक्कम कंपनीला मिळणार नाही. संपूर्ण रक्कम समभाग विक्री करणाऱ्या प्रवर्तक व गुंतवणूकदारांना मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.