For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

जि.प.-ता.पं. निवडणुकांच्या प्रक्रियेला वेग

06:58 AM Oct 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
जि प  ता पं  निवडणुकांच्या प्रक्रियेला वेग
Advertisement

आरक्षणाची प्राथमिक अधिसूचना आज प्रसिद्ध होणार : मंत्री ईश्वर खंड्रे यांची माहिती, आरक्षण प्रक्रिया अंतिम टप्प्यात

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेंगळूर

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकांच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांची आरक्षण यादी पूर्णपणे तयार झाली असून, यासंदर्भातील प्राथमिक अधिसूचना गुऊवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री ईश्वर खंडे यांनी दिली. बुधवारी चिक्कमंगळूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

Advertisement

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत घेण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मतदारसंघ पुनर्रचना आणि आरक्षण निश्चितीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना त्यावर हरकती आणि सूचना नोंदविण्याची संधी दिली जाईल. प्राप्त हरकतींची छाननी करून त्यावर निर्णय घेतल्यानंतर अंतिम आरक्षण यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

अनेक वर्षांपासून प्रशासकांच्या हाती कारभार

जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत या ग्रामीण स्थानिक प्रशासनातील महत्त्वाच्या संस्था आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून निवडणुका न झाल्याने अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींऐवजी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण स्थानिक संस्थांमध्ये पुन्हा लोकप्रतिनिधींचे नेतृत्व येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आरक्षणाची प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग येण्याची शक्मयता आहे. विविध राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी, मतदारसंघनिहाय राजकीय समीकरणांचा आढावा आणि निवडणुकीच्या तयारीला सुऊवात होण्याची शक्मयता आहे.

प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा सुरू होणार

प्राथमिक आरक्षण यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित मतदारसंघांतील नागरिक, राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांना आपली हरकत किंवा सूचना मांडता येणार आहे. या हरकतींचा विचार करून अंतिम आरक्षण यादी तयार केली जाईल. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तारीख आणि संपूर्ण कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळे प्राथमिक अधिसूचनेनंतर निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा सुरू होणार आहे. मतदारसंघ पुनर्रचना आणि आरक्षणाच्या प्रक्रियेकडे राजकीय पक्षांसह ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली चर्चा

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांची सद्यस्थिती आणि आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. बैठकीत पहिल्या टप्प्यात जानेवारीच्या सुऊवातीला जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. जि.प. आणि ता.पं. निवडणुका झाल्यानंतर पुढील टप्प्यात ग्रामपंचायत निवडणुकाही घेण्याचा सरकारचा प्राथमिक विचार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आरक्षणाची प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यातील ग्रामीण राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्मयता असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.