कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टोचन करून निघालेल्या कारला भरधाव ट्रॅव्हल्सने ठोकरले

04:44 PM May 19, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कराड :

Advertisement

बंद पडलेली इर्टिगा कार टोइंग क्रेनला टोचन करून शोरूमला घेऊन जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅव्हल्सने इर्टिगा कारला ठोकरल्याने झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले. पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर मलकापूर (ता. कराड) गावच्या हद्दीत डी मार्टसमोर रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत सचिन गणपत रवले (वय ४०, रा. मालचौंडी, ता. जावळी) यांनी कराड शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन रवले रविवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास कणकवली येथून कुटुंबीयांसमवेत त्यांच्या मालचौंडी या गावी निघाले होते. ते गगनबावडा येथील घाटात आले असता त्यांची इर्टिगा कार बंद पडली. म्हणून टोइंग क्रेनला इर्टिगा कार टोचन करून ते कराड येथील शोरूमला चालले होते. कोल्हापूर-सातारा लेनबरून कराडकडे येत असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास डी मार्टजवळ ते आले असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅव्हल्सने इर्टिगा कारला पाठीमागून ठोकरले. जोराच्या धडकेने कार टोइंग क्रेनवर आदळली. यात कारची पुढील व मागील दोन्ही बाजूचे मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातात अंकिता सचिन रवले, वेदांत सचिन रवले व प्रज्ञा राजेश कदम हे तिघे जखमी झाले आहेत. यावेळी अपघात स्थळापासून निघालेल्या रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल पुस्तके यांनी जखमींना स्वतःच्या कारमधून कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सचिन रवले यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रॅव्हल्सचालक संतोष केशव माने (रा. सांगली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article