For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुंजीनजीक भरधाव टँकर पलटी

12:42 PM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
गुंजीनजीक भरधाव टँकर पलटी
Advertisement

सुदैवाने जीवितहानी टळली : टँकरचे नुकसान

Advertisement

वार्ताहर/गुंजी

गुंजीनजीक संपर्क रस्त्यासाठी खोदण्यात येत असलेल्या चरीत बेळगावहून गोव्याकडे जाणारा 16 चाकी टँकर मंगळवारी पलटी झाल्याने अपघात घडला. मात्र सदर अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी टँकरचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार सदर टँकर खानापूरहून गोव्याकडे भारधाव वेगाने जात होता. त्याचवेळी गुंजीहून खानापूरच्या दिशेने एक बस जात होती. कलमेश्वर मंदिराच्या समोरील वळणावर दोन्ही वाहने समोरासमोर येताच टँकरने बसला चुकविण्यासाठी रस्त्याच्या बाजूला वाहन वळविण्याच्या प्रयत्नात वाहनावरील ताबा सुटल्याने सदर टँकर महामार्गासाठी सुरू असलेल्या संपर्क रस्त्याच्या चरीमध्ये जाऊन कोसळला. या ठिकाणी सध्या महामार्गाचे काम सुरू असून रस्त्याच्या बाजूने संपर्क रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रहदारी सुरू असलेल्या बेळगाव-पणजी रस्त्याची एका बाजूची बाजु पट्टी खणली गेल्याने त्या ठिकाणी वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.