महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अनगोळ शिवारातील रस्त्यावर वाहनचालक भरधाव

10:28 AM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महिलेला दिली धडक

Advertisement

बेळगाव : अनगोळ करल दंड शिवारातील बेळ्ळारी नाल्याजवळ रस्त्यावर एका भरधाव मोटरसायकलस्वाराने शेतकरी महिलेला धडक दिल्याने ती महिला शेतात जाऊन पडली. सुदैवाने पावसाळ्याचे दिवस असल्याने व जमीन ओली असल्याने त्या महिलेला मोठी दुखापत झाली नाही. शेतात पडलेल्या महिलेला शेतातून बाहेर काढण्याचे सौजन्य न दाखवताच त्या महिलेला तेथेच सोडून धूमस्टाईलने तेथून पोबारा केला. अनगोळ शिवारातील करल दंड येथील अनगोळ-येळ्ळूर रस्त्यावर वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याने शेतकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. शिवारातील काळा तलाव तसेच नाथ पै नगर येथील ढब्बू तलावाच्या बाजूने असलेल्या रस्त्यावरून येळ्ळूर, सुळगा, हट्टी तसेच पूर्व भागातील नागरिक तसेच युवक उद्यमबाग तसेच आसपासच्या परिसरात कामानिमित्त याच रस्त्याने दररोज सकाळ-संध्याकाळ ये-जा करत असतात.

Advertisement

वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढ

शिवारात सायंकाळी युवक व वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. शिवारातील या संपर्क रस्त्यावर रात्रीच्या अंधारात अनेक युवक गटागटाने येथे बसून नको ते प्रकार करत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

...तर शेतकरी बांधव धडा शिकवतील

अनगोळ-येळ्ळूर हा जोड रस्ता दोन्ही बाजूंनी सोयीचा झाला असला तरी आता शिवारात शेतकरी बांधव आपल्या कुटुंबासह शेतात काम करत आहेत. सायंकाळी या अनगोळ शिवारातील दोन्ही डांबरी रस्त्यावर महिला तसेच वयोवृद्ध व्यक्ती फिरावयास जात असतात. त्यामुळे या भागातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी आपली वाहने सावकाश चालवावी, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे. जर कोणी वाहनचालकाने या रस्त्यावरून जाताना वेगावर नियंत्रण न ठेवल्यास आणि नियम मोडल्यास शेतकरी बांधव धडा शिकवतील, असा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article