For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शाळेला निघालेल्या शिक्षिकेला भरधाव कारची धडक

06:54 AM Jul 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
शाळेला निघालेल्या शिक्षिकेला  भरधाव कारची धडक
Advertisement

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव

दुचाकीवरून शाळेला निघालेल्या शिक्षिकेला भरधाव कारने धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना सोमवारी सकाळी आझमनगर येथे घडली. यामध्ये शिक्षिका गंभीर जखमी झाली असून त्यांच्या पायाला, हाताला तसेच शरीरालाही जखमा झाल्या आहेत. कारचालकाने अपघात होताच तेथून पळ काढल्याने त्याचा शोध सुरू आहे.

Advertisement

टिळकवाडी येथील सरकारी मराठी मुलांची शाळा क्र. 9 मधील शिक्षिका राजश्री वराळे या नेहमीप्रमाणे आझमनगर येथून राणी चन्नम्मा चौकाकडे शाळेला येण्यासाठी दुचाकीवरून निघाल्या होत्या. यावेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये राजश्री या रस्त्यावर कोसळल्या तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातानंतर कारचालकाने त्यांना रस्त्याच्या बाजूला बसवत तेथून पळ काढला.

सकाळी 9.30 च्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये राजश्री यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे तातडीने त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. धडक जोरात बसल्याने दोन्ही पायांना प्लास्टर घालण्यात आले असून हात तसेच शरीराच्या इतर भागालाही जखमा झाल्या आहेत. पोलिसांच्या हेल्पलाईनला संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली आहे. संबंधित वाहनचालकाचा शोध सुरू आहे.

Advertisement
Tags :

.