Kolhapur News | आटपाडी खटकाळे मळा परिसरात भरधाव कारची धडक ; एकाचा जागीच मृत्यू
02:27 PM Feb 16, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
आटपाडीमध्ये भरधाव कारच्या धडकेत शहाजी देशमुख यांचा मृत्यू
Advertisement
आटपाडी - आटपाडी मध्ये भरधाव कारने पाठीमागून धडक दिल्याने शहाजी शिवाजी देशमुख (६०) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालक कृष्णा अण्णा बेहेरे (रा. चिंचोली ता. सांगोला, जि. सोलापूर) याच्यावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आटपाडी खटकाळे मळा येथील उदयसिंह तानाजी देशमुख यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. उदयसिंह यांचे चुलते शहाजी हे थिएटर चौक ते कारखाना रोडने चालत जात होते. भारत पेट्रोल पंप समोरून जाताना पाठीमागून भरधाव आलेल्या गाडीने जोराची धडक दिली.
Advertisement
कृष्णा बेहेरे यांनी स्विफ्ट डिझायर कार (एमएच ४५- एडी ६४३६) भरधाव, निष्काळजीपणे चालून शहाजी देशमुख यांना मागून धडक दिली. त्यात त्यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.
Advertisement