For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भरधाव कारची पादचाऱ्यांना धडक

03:03 PM Jan 25, 2025 IST | Radhika Patil
भरधाव कारची पादचाऱ्यांना धडक
Advertisement

सातारा, वाई : 

Advertisement

वाई बसस्थानकाच्या समोर भरधाव मोटारीने पादचाऱ्यांना ठोकर मारल्याने राजेंद्र बजरंग मोहिते (सोळशी, ता. कोरेगाव) या पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच साडेतीन वर्षाच्या मुलासह अन्य चार जण गंभीर जखमी झाले. हसन जिन्नससाहेब बोरवी (कोरची ता हातकणंगले, कोल्हापूर) या वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गर्दीच्या रस्त्यात भरधाव वाहन घुसल्याने हा अपघात झाला असे परिक्षाविधीन पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांनी दिली. दरम्यान, संबंधित वाहनचालकाने दारू पिली होती, अशी चर्चा घटनास्थळी होती. त्याला मेडिकल नेण्यात आले असून अद्याप त्याबाबत स्पष्टता मिळाली नाही.

वाई बसस्थानकाच्या समोर महाबळेश्वर येथून वाई शहराकडे येणाऱ्या रस्त्यावर भरधाव व्हॅगनॉर गाडी क्रमांक (एमएच 04 जीई 6695) ने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या पादचाऱ्यांना जोरदार धडक मारली. गाडी त्याच वेगात पुढे जात राहिल्याने गाडीच्या धक्क्याने एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात राजेंद्र बजरंग मोहिते (सोळशी, ता कोरेगाव) यांचा जागी मृत्यू झाला. अक्षय नामदेव कदम व अविनाश केळगणे (वरोशी, ता. महाबळेश्वर), सिताराम धायगुडे (वाई) व शिवांश जालिंदर शिंगटे (राऊतवाडी ता. कोरेगाव) हा साडेतीन वर्षांचा मुलगा हे गंभीर जखमी झाले. जखमींना वाई व सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व पादचारी वाई बाजारपेठेतील आपली कामे उरकून आपापल्या घरी चाललेले असताना सायंकाळी साडेचारच्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघाताने बस स्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिक व आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी भरधाव वाहन अडवून चालकाला चोप दिला. गाडीतील अन्य तीन जण पळून गेले. हसन जिन्नससाहेब बोरवी (कोरची ता हातकणंगले, कोल्हापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती परिक्षाविधीन पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी श्याम पानेगावकर यांनी दिली. उपनिरीक्षक बिपिन चव्हाण तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.