For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli : कवठेमहांकाळ येथे भरधाव कारची विजेच्या पोलला धडक; एक गंभीर जखमी

03:38 PM Dec 28, 2025 IST | NEETA POTDAR
sangli   कवठेमहांकाळ येथे भरधाव कारची विजेच्या पोलला धडक  एक गंभीर जखमी
Advertisement

                          रत्नागिरी–नागपूर महामार्गावर भीषण अपघात

Advertisement

कवठेमहांकाळ : रत्नागिरी नागपूर महामार्ग क्र १६६ वर महामार्ग पोलिस केंद्राचे दक्षिणेस सोलापूर ते मिरज जाणाऱ्या रोडवर शनिवारी ८.३० वाजता भरधाव वेगात असलेल्या कारची महामार्गालगत विजेच्या पोलला जोरदार धडक होऊन एक गंभीर जखमी झाला असून अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

शनिवारी सकाळी स्विफ्ट कार ते मिरजकडे जात असताना रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवित असताना हॉटेल नक्षत्र समोर, अलकूड एमचे हददीतमहामार्गावर जात असताना मिरज लेनवरील कार चालक याने लाईटच्या पोलला जोराची धडक दिली.

Advertisement

यामध्ये कारचलक किरकोळ जखमी होवून त्याचे गाडीच्या मागील सिट वरील डाव्या बाजूच्या इसम वामन बाबुराव जाधव (वय ४० रा. वसमत जि. नांदेड) हे गंभीर जखमी झाले.तर रवी क्षीरसागर रा. पंढरपूर व आप्पासाहेब कोडके हे किरकोळ जखमी झाले आहेत.
यातील कार चालकाने भरध् एव वेगाने, हायगईने गाडी चालवून अपघात करण्यास कारणीभूत झाला आहे. सदर अपघातमध्ये वाहनाचे नुकसान झाले आहे.

Advertisement
Tags :

.