महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रेल्वे घातपात कटाप्रकरणी तपासाला वेग

06:40 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

8 पथकांची स्थापना : 5 गावांमधील घरोघरी होणार तपासणी : एनआयए-एटीएसकडून अनेक जण ताब्यात

Advertisement

वृत्तसंस्था/ कानपूर

Advertisement

उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथून भिवानीच्या दिशेने जात असलेल्या कालिंदी एक्स्प्रेसला रेल्वेमार्गावर एलपीजी सिलेंडर ठेवून उलटविण्याचा कट रचण्यात आला होता. या कटाप्रकरणी आता तपासाला वेग देण्यात आला आहे. पोलिसांची 8 पथके आता घटनास्थळापासून सुमारे एक किलोमीटरच्या कक्षेत येणाऱ्या 5 गावांमधील घरोघरी जात झडती घेणार आहे. या झडतीत आक्षेपार्ह सामग्री आढळली तर त्वरित कारवाई केली जाणार आहे.

कालिंदी एक्स्प्रेसला पलटविण्याच्या षड्यंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी शिवराजपूर, चौबेपूर आणि बिल्हौर पोलीस स्थानकांच्या निरीक्षकांच्या नेतृत्वात तीन पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांना छापेमारी आणि पुरावे जमविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याचबरोबर सर्व्हिलान्स आणि स्वॅट पथकांनाही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

गुन्हे अन्वेषण शाखा आणि विविध पोलीस स्थानकांच्या कर्मचाऱ्यांची निवड करत  मंगळवारी 8 पथके स्थापन करण्यात आली. या प्रत्येक पथकात 6 पोलीस सामील असतील. ही 8 पथके घटनास्थळापासून सुमारे एक किलोमीटरच्या कक्षेत येणाऱ्या मुडेरी, कंठी निवादा, सेन निवादा, महामार्गापलिकडे असलेला दरिया निवादा आणि सिकरामऊ गावात तपास करणार आहेत.

पोलिसांची पथके आता शेत, झुडुपांमध्ये आणि गावातील घरोघरी झडती घेत आहेत. आसपासच्या एखाद्या घरात किंवा शेतात किंवा झुडुपात एखादे स्फोटक किंवा आक्षेपार्ह सामग्री लपविण्यात आली असेल तर तिचा शोध घेणे या मागील उद्देश आहे.

तपासात मोठा खुलासा

कालिंदी एक्स्प्रेसला पालाटविण्याच्या कटाच्या प्रयत्नादरम्यान मोठा खुलासा झला आहे. मागील एक आठवड्यात 4 वेळा रेल्वेला पालटविण्याचा प्रयत्न झाला होता. मागील 23 दिवसांमध्ये कानपूरच्या आसपास तीनवेळा रेल्वे घातपात घडविण्याचा कट रचण्यात आला होता. याप्रकरणी एनआयए आणि उत्तरप्रदेश एटीएस आणि आयबी तपास करत आहे.

पाकिस्तानी दहशतवाद्याचा व्हिडिओ

पाकिस्तानी दहशतवादी फरहतुल्लाह घोरीने अलिकडेच एक व्हिडिओ जारी केला होता. यात त्याने स्वत:च्या फॉलोअर्सना मोठ्या प्रमाणावर रेल्वे घातपात घडवून आणण्यासाठी चिथावणी दिली होती. कानपूरमध्ये कालिंदी एक्स्प्रेसच्या मार्गावर सिलेंडरसोबत पेट्रोल आणि माचिस मिळणे एका मोठ्या कटाचा संकेत देत आहे. यामागे दहशतवादी कट असूही शकतो. याप्रकरणी आतापर्यंत एकूण 14 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article