For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसच्या मोर्चेबांधणीला वेग! आठ राज्यांमध्ये निवडणूक समिती जाहीर

06:38 AM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसच्या मोर्चेबांधणीला वेग  आठ राज्यांमध्ये निवडणूक समिती जाहीर
Advertisement

आठ राज्यांमध्ये निवडणूक समिती जाहीर : वॉर रूम, प्रचार समितीही स्थापन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाने 8 राज्यांमध्ये निवडणूक समिती स्थापन केली. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, नागालँड आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. याशिवाय पक्षाने सेंट्रल वॉर रूम आणि प्रचार समितीही स्थापन केली आहे. मध्य प्रदेशच्या निवडणूक समितीची जबाबदारी जितू पटवारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्याचवेळी राजस्थानमध्ये पक्षाने गोविंद सिंग दोतासरा यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. दुसरीकडे, तेलंगणातील निवडणूक समितीच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसने मुख्यमंत्री रेवंत रे•ाr यांची निवड केली आहे.

Advertisement

आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने काँग्रेसने विविध राज्यांमध्ये संघटनात्मक नियुक्त्या करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या समित्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विविध मतदारसंघातील पक्षाच्या ग्राउंड रिअॅलिटीचे मूल्यांकन करतील. पक्ष कुठे मजबूत आहे, कुठे पिछाडीवर आहे, याचा संपूर्ण अहवाल केंद्रीय समितीला देण्यात येणार आहे. या आधारावर पक्ष जागावाटपाची भूमिका मांडणार आहे.

अजय माकन यांच्याकडे प्रचार समितीची कमान

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार समितीची कमान अजय माकन यांच्याकडे देण्यात आली आहे. केसी वेणुगोपाल आणि जयराम रमेश यांचाही या समितीत समावेश आहे. तसेच पक्षाने  मध्यवर्ती वॉर रूमची घोषणाही केली आहे. यामध्ये संघटनात्मक वॉर रूम आणि कम्युनिकेशन वॉर रूमचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे तळागाळातील महत्त्वाचे निर्णय आणि नियोजन संघटनात्मक वॉर रूममध्ये होणार आहे. या समितीचे अध्यक्ष शशिकांत सेंथिल असतील, तर गोकुळ बुटैल, नवीन शर्मा, वऊण संतोष आणि अरविंद कुमार यांना सदर समितीचे उपाध्यक्षपद बहाल करण्यात आले आहे. त्याचबरोबर पक्षाच्या घोषणांना अंतिम रूप देणे, सोशल मीडिया, प्रचारादरम्यान नेत्यांना माहिती देणे असे महत्त्वाचे निर्णय संवाद वॉर रूममध्ये घेतले जातील. त्याचे अध्यक्ष वैभव वालिया असतील.

Advertisement
Tags :

.