For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

06:55 AM Jul 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
Advertisement

 राजा चार्ल्स तिसरे यांच्याकडून संदेश वाचन, महासागर-जलमार्ग प्लास्टिक प्रदूषणमुक्त करण्याचे आवाहन

Advertisement

वृत्तसंस्था, ग्लासगो : 23 व्या राष्ट्रकुल खेळांच्या निमित्ताने ‘ओव्हो हायड्रो’ संगीत आणि स्कॉटिश वैभवाच्या इंद्रधनुष्यात रूपांतरित झाले. राष्ट्रकुल खेळांचे उद्घाटन एका उत्साही इनडोअर सोहळ्याने झाले, ज्यामध्ये ग्लासगोच्या वारशाचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर या भव्यतेत शाश्वततेचा संदेशही हरवून जाणार नाही याची काळजी घेण्यात आली.

राजा चार्ल्स तिसरे यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये बकिंगहॅम पॅलेसमध्ये ‘किंग्ज बॅटन’मध्ये ठेवलेला संदेश मोठ्याने वाचला. त्यानंतर ही बॅटन 500 दिवसांच्या जागतिक रिलेदरम्यान राष्ट्रकुलच्या सर्व 74 सदस्य राष्ट्रांमधून फिरली होती. खेळांचे उद्घाटन करताना मला आनंद होत आहे, असे राजा चार्ल्स तिसरे यांनी गुऊवारी रात्री सांगितले. या बॅटनमध्ये एक अतिरिक्त संदेश होता, ज्यात महासागर आणि जलमार्गांना प्लास्टिक प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Advertisement

या सोहळ्यात पारंपरिक गेलिक वारसा आणि समकालीन पॉप, रॅप व इलेक्ट्रॉनिक संगीत सादरीकरण यांचा मिलाफ झाला. युनेस्को सिटी ऑफ म्युझिक म्हणून मान्यता मिळालेल्या शहराच्या सर्जनशील ओळखीवर मोठ्या प्रमाणावर हा सोहळा आधारित होता. भव्य खुल्या स्टेडियममधील कार्यक्रमांपासून दूर जात आयोजकांनी उद्घाटन सोहळा पूर्णपणे 14,300 आसनक्षमतेच्या इनडोअर बाऊलमध्ये आयोजित केला. असे राष्ट्रकुल खेळांच्या इतिहासात प्रथमच घडले.

आणखी एका प्रथमच घडलेल्या प्रकारात 74 राष्ट्रांतील खेळाडूंनी कार्यक्रमाच्या शेवटी नव्हे, तर अगदी सुऊवातीलाच मैदानात संचलन केले. भारतीय पथकाचे नेतृत्व ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानू आणि लव्हलिना बोरगोहेन यांनी केले. पुऊष खेळाडू नेव्ही ब्लू सूटमध्ये आणि महिला स्पर्धक साड्या आणि ब्लेझरमध्ये झळकले. भारतीय तुकडीने प्रेक्षकांच्या प्रचंड जल्लोषात प्रवेश केला. स्थानिक स्कॉटिश वनस्पतींनी युक्त 200 चौरस मीटरच्या रंगमंचीय बागेत 74 काठ्या रोवल्या जात असताना स्पॉटलाइटच्या प्रकाशात पाईप वादकांनी ’फ्लॉवर ऑफ स्कॉटलंड’ हे गीत सादर केले. संध्याकाळच्या मुख्य पारंपरिक क्षणांपैकी एक होता.

Advertisement
Tags :

.