श्रीराम नवमीच्या दिवशी सूर्याची किरणे पडणार रामल्लावर; राममंदिरातील अद्भूत वास्तूकलेचा नमुना
आज प्रभू श्रीराम अयोध्येतील भव्य राम मंदिरात विराजमान झाले आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामल्ला मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी मंदिरातील अद्भूत वास्तूकलेचा नमुना पाहायला मिळाला.अयोध्येतील राम मंदिर हेवैशिट्यपूर्ण आहे.केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी अयोध्या मंदिरातील अनोख्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती दिली. त्यांनी म्हटले की, राम मंदिरात एक विशेष सूर्य तिलक तंत्र आहे. त्याचे डिझाईन असे तयार केले गेले आहे की, प्रत्येक वर्षी श्रीराम नवमीच्या दिवशी दुपारच्या वेळी सूर्याची किरणे प्रभू रामच्या मूर्तीवर पडतील. ही सूर्यकिरणे रामलल्लाच्या कपाळावर जवळपास ६ मिनिटांपर्यंत असतील. बेंगळुरुमध्ये भारतीय खगोल संशोधन संस्थेने हे खास प्रकारचे डिझाइन तयार केले आहे. त्यानी म्हटले की, गियरबॉक्स आणि पारदर्शक लेंसची व्यवस्था अशा प्रकारे करण्यात आली आहे की, शिखरावरील तिसऱ्या मजल्यावरून सूर्यकिरणे थेट गर्भगृहात पडतील.