For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दसरा-दिवाळीसाठी मुंबई-बेंगळूर मार्गावर विशेष रेल्वे

06:20 AM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
दसरा दिवाळीसाठी मुंबई बेंगळूर मार्गावर विशेष रेल्वे
Advertisement

त. भा. प्रतिनिधी /बेळगाव

Advertisement

दसरा, दिवाळी या सणांच्या निमित्ताने मध्य रेल्वेच्यावतीने मुंबई-बेंगळूर या मार्गावर उत्सव स्पेशल रेल्वे सोडली जाणार आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते बेंगळूरच्या सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनलपर्यंत रेल्वे धावणार आहे. विशेष म्हणजे ही रेल्वे बेळगावमधून धावणार असल्याने येथील प्रवाशांना बेंगळूर व मुंबईपर्यंत पोहोचणे सोयीचे होणार आहे.

मुंबई-बेंगळूर उत्सव स्पेशल रेल्वे 10 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे. रात्री 12.35 वाजता मुंबईहून निघालेली रेल्वे दुसऱ्या दिवशी रात्री 11.55 वाजता बेंगळूरला पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात पहाटे 4.30 वाजता निघालेली रेल्वे दुसऱ्या दिवशी पहाटे 4.05 वाजता मुंबईला पोहोचेल. या एक्स्प्रेसच्या एकूण सात फेऱ्या होणार आहेत. मुंबईहून प्रत्येक शनिवारी तर बेंगळूरहून रविवारी एक्स्प्रेस धावेल.

Advertisement

या रेल्वेला दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, लोणंद, सातारा, कराड, सांगली-मिरज, कुडची, रायबाग, घटप्रभा, बेळगाव, लोंढा, धारवाड, हुबळी, हावेरी, राणेबेन्नूर, हरिहर, दावणगेरी, बिरुर, अरसीकेरे व तुमकूर असे थांबे दिले जाणार आहेत. एकूण 18 डबे असून प्रवाशांनी या एक्स्प्रेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.