कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिवाळीनिमित्त बेळगाव-हैदराबाद मार्गावर विशेष रेल्वे

06:45 AM Oct 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव :

Advertisement

दिवाळीनिमित्त रेल्वेने बेळगाव-हैदराबाद या मार्गावर विशेष रेल्वेच्या सहा फेऱ्या जाहीर केल्या आहेत. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वेफेरी सुरू केली आहे. यामुळे हैदराबादसह मंत्रालय येथील देवस्थानला जाणे सोयीचे होणार आहे. रेल्वे क्रमांक 07043 ही एक्स्प्रेस हैदराबाद येथून सायं. 4.30 वा. दि. 23 व 30 ऑक्टोबर, तसेच दि. 6, 13, 20, 27 नोव्हेंबर रोजी निघणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वा. बेळगावला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात बेळगावमधून दुपारी 1 वा. दि. 23, 31 ऑक्टोबर व दि. 7, 14, 21, 28 नोव्हेंबर रोजी निघणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वा. हैदराबाद येथे पोहोचेल. या रेल्वेला लोंढा, अळणावर, धारवाड, हुबळी, गदग, भणापूर, कोप्पळ, होसपेट, तोरनगल्लू, बळ्ळारी, कडोली, मंत्रालय रोड, रायचूर यासह इतर थांबे देण्यात आले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article