कुंभमेळ्यासाठी बेळगावच्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे
हुबळी-वाराणसी दरम्यान तीन फेऱ्या
बेळगाव : बेळगावमधून महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. दि. 14, 21, 28 फेब्रुवारी रोजी ही एक्स्प्रेस हुबळी-वाराणसी दरम्यान धावणार आहे. परतीच्या प्रवासात दि. 17 व 24 फेब्रुवारी तर 3 मार्च रोजी वाराणसी-हुबळी दरम्यान धावेल. हुबळी येथून सकाळी 8 वा. एक्स्प्रेस निघणार आहे. या एक्स्प्रेसला धारवाड, अळणावर, लोंढा, खानापूर, बेळगाव, गोकाक रोड, घटप्रभा, रायबाग, कुडची, मिरज यासह इतर थांबे देण्यात आले आहेत. कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने रेल्वेची मागणी होत होती. याची दखल घेत नैर्त्रुत्य रेल्वेने विशेष तीन फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेळगावच्या प्रवाशांची कुंभमेळ्याला ये-जा करण्यासाठी उत्तम सोय होईल. अधिक माहितीसाठी रेल्वेच्या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.