For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

हुबळी-वाटवा दरम्यान विशेष रेल्वे

06:31 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
हुबळी वाटवा दरम्यान विशेष रेल्वे
Advertisement

रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी मार्गात बदल

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

दिवाळीनिमित्त हुबळी ते वाटवा (गुजरात) या दरम्यान विशेष रेल्वे फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. हुबळी येथून गुरुवार दि. 5 रोजी रात्री 10.15 वाजता निघणार असून शुक्रवारी रात्री 9.50 वाजता वाटवाला पोहोचणार आहे. ही रेल्वे धारवाड, अळणावर, लोंढा, बेळगाव, गोकाक रोड, घटप्रभा, रायबाग, कुडची, मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे असे थांबे दिले जाणार आहेत.

Advertisement

याबरोबरच पुणे विभागातील दौंड ते मनमाड दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने काही एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. मुझफ्फरापूर-हुबळी एक्स्प्रेस 13 रोजी 2 तास 30 मिनिटे उशिराने धावणार आहे. बेंगळूर-नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस 15, 17, 29 नोव्हेंबर तर 1, 6, 8 व 20 डिसेंबर रोजी 2 तास 10 मिनिटे उशिराने धावणार आहे.

वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्पे्रस 16, 18, 23, 27, 28, 30 नोव्हेंबर तर 2, 4, 5, 7, 9 व 11 डिसेंबर रोजी 40 मिनिटे उशिराने धावणार आहे. यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्स्प्रेस 17 नोव्हेंबर 1 व 8 डिसेंबर रोजी 2 तास उशिराने धावणार आहे. याबरोबरच काही एक्स्प्रेच्या मार्गात बदल करण्यात आला असल्याने प्रवाशांनी या बदलानुसार प्रवास करण्याचे आवाहन नैर्त्रुत्य रेल्वेच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.