Konkan Railway: मडगाव-पनवेल मार्गावर 'समर-स्पेशल' ट्रेन धावणार, असे आहे वेळापत्रक
मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना मोठा अतिरिक्त फेरीमुळे दिलासा मिळणार
रत्नागिरी : उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने मडगाव जंक्शन आणि पनवेल दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना मोठा अतिरिक्त फेरीमुळे दिलासा मिळणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्र. ०११०६ मडगाव जं. ते पनवेल साप्ताहिक स्पेशल गाडी १७मे २०२६ (रविवार) रोजी मडगाव जंक्शन येथून दुपारी १६.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी क्र. ०११०५ पनवेल मडगाव जं. साप्ताहिक स्पेशल ट्रेन १८ मे २०२६ (सोमवार) रोजी पनवेल येथून पहाटे ०५.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी
संध्याकाळी १८.१० वाजता गोव्यात मडगाव जंक्शनला पोहोचेल. या गाडीला एकूण २३ डबे असतील यामध्ये ३-टायर एसी ०३ कोच, स्लीपरः ११ कोच जनरलः ०७ कोच तर एसएलआर/डी : ०२ कोच अशी या गाडीची कोचरचना असणार आहे. यातील गाडी क्रमांक ०११०६ साठीचे बुकिंग सर्व पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम, इंटरनेट आणि IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाले आहे
या स्थानकांवर घेणार थांबे
या प्रवासात गाडी करमळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, पेण या स्थानकांवर थांबणार आहे.