मालवण कथामालेचा 'अज्ज्याच मज्जा! मुलांच्या राज्यात ' कार्यक्रम संपन्न
आचरा | प्रतिनिधी
मालवण कथामालेच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त मुलांसाठी विशेष कार्यक्रम संपन्न होत आहे. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेच्या वतीने पेंढर्याची वाडी, पेंडूर, ता. वेंगुर्ले या प्राथमिक शाळेत मुलांसाठी 'अज्ज्याच मज्जा! मुलांच्या राज्यात!' हा मालवण कथामालेचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात गोष्टी, गप्पा, गाणी, अभिनय गीत प्रबोध, परिकथा, ऐतिहासिक कथा, पौराणिक कथा आदींचे सादरीकरण मुलांसमोर करण्यात आले.
यात कथामालेच्या वतीने सुरेश ठाकूर, सदानंद कांबळी, विजय चौकेकर, सुरेंद्र सकपाळ, चंद्रशेखर हडप आदी ज्येष्ठ कथामाला कार्यकर्त्यांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. देवयानी त्रिंबक आजगावकर तसेच सहकारी शिक्षक मुकुंद जयदेव काळोजी, समीर मोहन तेंडोलकर यांनी विशेष सहाय्य केले. गौरी पटनाईक (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती) यांनी विशेष आयोजन केले. देवयानी आजगावकर, मुख्याध्यापक तसेच जिविका हरमलकर, केयांश हरमलकर, साईश पटनाईक आदी विद्यार्थ्यांनी विशेष गुणदर्शनपर कार्यक्रम सादर केले.