For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम

राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम
Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी : राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडीच्या उच्च माध्यमिक सांस्कृतिक विभागातर्फे बुधवार, २९ जुलै रोजी सकाळी ९.१५ वाजता गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

या कार्यक्रमात उच्च माध्यमिक विभागातील निवृत्त प्राध्यापकांचा सत्कार करून त्यांना गुरुदक्षिणा अर्पण करण्यात येणार आहे. तसेच ज्युनिअर कॉलेजला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने गेल्या पन्नास वर्षांतील सर्व निवृत्त प्राध्यापकांचा गौरव सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. तरी या विशेष कार्यक्रमास माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.