For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

२२ जानेवारीला सावंतवाडीत महिलांसाठी खास कार्यक्रम

11:57 AM Jan 18, 2024 IST | अनुजा कुडतरकर
२२ जानेवारीला सावंतवाडीत महिलांसाठी खास कार्यक्रम
Advertisement

मोहिनी मडगावकर ; अयोध्या राम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी
श्रीराम जन्मभूमी अयोध्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा या कार्यक्रमाचे औचित्य साधून भाजप पक्षाच्या वतीने मोहिनी मडगावकर व महिला मोर्चा भाजप सावंतवाडी आयोजित सावंतवाडीकरांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. दिनांक 22 जानेवारी सकाळी बारा ते रात्री साडेअकरा पर्यंत कार्यक्रम असतील. सावंतवाडी भोसले उद्यान येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी दुपारी १२ वाजता प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात येईल त्यानंतर सर्व नागरिकांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे .खास आकर्षण म्हणजे सुंदर रांगोळीचा देखावा करण्यात येणार आहे. नंतर संध्याकाळी पाच वाजल्यापासून महिला मोर्चा सावंतवाडीकडून सावंतवाडी तालुक्यातील सर्व महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम करण्यात येणार आहे .तरी सर्व महिलांनी या कार्यक्रमास सहभागी व्हावे असे आवाहन भाजप महिला मोर्चा भाजप शहर अध्यक्षा मोहिनी माडगावकर यांनी आज येथे केले . तसेच संध्याकाळी ७ वाजता पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून नंतर दीपोत्सवाचा कार्यक्रम करण्यात येईल .व महिलांसाठी खास आकर्षण म्हणजे खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे . विजेत्या प्रथम क्रमांकाला बक्षीस म्हणून पैठणी व इतर दोन बक्षीस दोन साड्या असणार आहेत व सर्व महिलांसाठी लकी ड्रॉ स्पर्धा पण घेण्यात येणार आहेत. यामध्ये विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत . तसेच ऑन द स्पॉट गेम घेण्यात येतील .सायंकाळी करण्यात येणारी फटाक्यांची आतिषबाजी सावंतवाडीकारांसाठी खास आकर्षण ठरणार आहे .युवा वर्गासाठी व सर्वांसाठी डीजेच्या तालावर डान्स करायची संधी मिळणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचा जल्लोष सावंतवाडीत केला जाणार आहे . यावेळी भाजप महिला अध्यक्ष मोहिनी मडगावकर ,सरचिटणीस मेघना साळगावकर ,ज्योती मुद्राळे ,सविता टोपले उपस्थित होत्या .

Advertisement
Advertisement
Tags :

.