For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रामकृष्ण मिशन आमतर्फे विशेष कार्यक्रम

12:02 PM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
रामकृष्ण मिशन आमतर्फे विशेष कार्यक्रम
Advertisement

आश्रमतर्फे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त उद्यापासून आयोजन

Advertisement

बेळगाव : स्वामी विवेकानंद यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या बेळगावच्या रामकृष्ण मिशन आश्रमने गेल्या 25 वर्षांपासून समाज हिताच्यादृष्टीने आध्यात्मिक सेवा दिली आहे. या रौप्यमहोत्सव वर्षानिमित्त आश्रमतर्फे दि. 8 ते 10 मे दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद 16 ऑक्टोबर 1892 रोजी भारत भ्रमण करत बेळगावला आले. 27 ऑक्टोबरपर्यंत त्यांचे वास्तव्य बेळगावमध्ये राहिले. पहिले तीन दिवस ते सदाशिव बाळकृष्ण भाटे यांच्या निवासस्थानी वास्तव्यास होते. या ठिकाणी स्वामीजींनी वापरलेला पलंग, काठी, आरसा आजही जतन करून ठेवण्यात आला आहे. स्वामी विवेकानंदांचे विशेष चित्रकला प्रदर्शन येथे पाहावयास मिळते.

यानंतर नऊ दिवस तत्कालिन वनाधिकारी हरिपाद मित्रा यांच्या किल्ल्यातील निवासस्थानी मुक्कामास राहिले. हे निवासस्थान जून 2000 मध्ये कर्नाटक सरकारने रामकृष्ण मिशनकडे हस्तांतरित केले. प. पू. पुऊषोत्तमानंद महाराज यांच्या नेतृत्वात 2004 मधील 23 जानेवारीला रामकृष्ण परमहंस यांचे विश्वभावैक्य मंदिर म्हणून नावाऊपास आले. स्वामींनी बेळगावला भेट दिल्यावेळी काढलेल्या भावचित्राला अनुसरून त्यांची मूर्ती इथे उभारली. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रामकृष्ण मठ व बेलूर मठाचे उपाध्यक्ष स्वामी सुहितानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दि. 8 रोजी ‘रामकृष्ण मननम’ कार्यक्रमांतर्गत डॉ. एस. पी. गुरुदास हे भगवान रामकृष्ण यांच्यावर हरिकथा सादर करतील. त्यानंतर रामकृष्ण आणि त्यांचे शिष्य या विषयावर व्याख्यान होणार असून सायं. 6.45 वा. ‘शरणदास वाणी’ कार्यक्रम संगीता कट्टी सादर करणार आहेत.

Advertisement

दि. 9 रोजी शारदादेवी यांच्यावर व्याख्यान होणार आहे. याप्रसंगी स्वामी सुहितानंद आशीर्वचन करतील. दुपारी निनाद अशोक नृत्यअंलकार, रोहित माने हे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. तर ‘माझी आई शारदादेवी’ या विषयावर व्याख्यान होईल. सायंकाळी ख्यात हिंदुस्थानी गायक पं. रघुनंदन पणशीकर यांची भजनसंध्या हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्या आहे. दि. 3 मे रोजी ‘स्वामी विवेकानंद मननम’ या अंतर्गत भजन, पूजा होईल. त्यानंतर स्वामी विवेकानंद यांच्यावर अनेक ज्येष्ठ स्वामी विचार मांडतील. स्वामी सुहितानंद समारोप करतील. दुपारी डॉ. दत्तात्रय वेलणकर व डॉ. एच. एन. मुरलीधर हे विवेकगान- चिंतन हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. सतारवादक पं. पुरबग्यान चटर्जी यांच्या सतारवादनाने रौप्यमहोत्सवी वर्षाची सांगता होईल. नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आश्रमाचे सचिव आत्मपूर्णानंद यांनी केले.

Advertisement
Tags :

.