‘वंदे मातरम्’चा विशेष टप्पा 23 पासून गोव्यात
पणजी : राष्ट्रगीत वंदे मातरम्च्या 150 व्या स्मृतिदिनानिमित्त देशभरात वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासंबंधी विशेष टप्पा दि. 23 ते 30 मार्च दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. या विशेष टप्प्यात नागरिकांना सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या टप्प्यातील उत्सव ‘शहीदी दिवस’ निमित्त साजरा केला जाईल. स्वातंत्र्यलढ्यातील शूरवीरांना, विशेषत: ‘वंदे मातरम्’च्या इतिहासाशी आणि वारशाशी संबंधितांना आदरांजली वाहण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. गोव्यात होणाऱ्या उत्सवांच्या समन्वयासाठी कला आणि संस्कृती खात्याची नोडल विभाग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ते या स्मरण सप्ताहादरम्यान रवींद्र भवन येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ‘वंदे मातरम’ सांस्कृतिक प्रदर्शन आयोजित करतील आणि एक-मिनिटाची ‘वंदे मातरम्’ फ्रेम रील बनवण्याची स्पर्धा सुरू करतील. शहीदी दिनानिमित्त 23 मार्च 2026 रोजी शाळांमध्ये सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायनाचे आयोजन केले जाईल. पंचायत स्तरावर, गावपातळीवर कार्यक्रमांच्या आयोजनास मदत करेल आणि उत्सवासाठी योग्य सार्वजनिक जागा निश्चित करून सामुदायिक सहभागास प्रोत्साहन देईल. या विशेष टप्प्यात शैक्षणिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहभागातून विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रोत्साहन देण्याचे आवाहन ‘वंदे मातरम्’शी संबंधित ऑडिओ आणि व्हिडिओ क्रिएटिव्ह अधिकृत पोर्टलवरून डाउनलोड केले जाऊ शकतात. नागरिक सहभाग आणि डिजिटल पोहोच वाढविण्यासाठी खात्यांनी या वैशिष्ट्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.