स्पेशल ऑप्स सीझन 2 चा ट्रेलर प्रदर्शित
के.के. मेनन यांची वेबसीरिज
स्पेशल ऑप्सला ओटीटीच्या उत्तम सीरिजपैकी एक मानले जाते. 2020 मध्ये याचा पहिला सीझन प्रदर्शित झाला होता आणि आता सुमारे 5 वर्षांनी दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. निर्मात्यांनी या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. देशावर कशाप्रकारे सायबर वॉरचा धोका घोंगावत आहे हे या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे.
ओटीटी प्रेमी आता या सीझनची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. सीझन 2 ची कहाणी यावेळी सायबर वॉर आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्सवर बेतलेली असल्याचे ट्रेलरमधून स्पष्ट होते. स्पेशल ऑप्स 2 चा प्रीमियर 11 जुलै रोजी होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म जियो हॉटस्टारवर ही सीरिज पाहता येणार आहे.
ऑप्स सीजन 2 मध्ये खलनायक म्हणून ताहिर राज दिसुन येणार आहे. ट्रेलरमध्ये त्याची झलक दिसून आली असून तो अत्यंत स्टायलिश आणि धोकादायक दिसून येत आहे. त्याची संवादफेक क्षमता या सीरिजला आणखी यश मिळवून देणार आहे. याचबरोबर अन्य कलाकारांनी देखील ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेतले आहे.