दहशतवाद्यांच्या शोधार्थ सांबामध्ये विशेष मोहीम
06:28 AM Apr 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ श्रीनगर
Advertisement
काश्मीरमधील सांबा येथे तीन संशयित दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी रविवारी सकाळपासून विशेष शोधमोहीम सुरू केली. दारुई परिसरातील बेध खड येथील एका रहिवाशाने अंधाराचा फायदा घेऊन एका कोरड्या ओढ्याजवळून जाणाऱ्या तीन अज्ञात व्यक्तींना पाहिल्याची माहिती दिल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. संशयितांपैकी एकाच्या पाठीवर जड सॅक होती. प्रथमदर्शनी त्यांच्याकडे कोणतीही शस्त्रs दिसत नसली तरी ते दहशतवादी असल्याचा संशय असल्यामुळे स्थानिक पोलिसांच्या विशेष कृती गटाने लष्कर आणि निमलष्करी दलांच्या मदतीने संशयितांना शोधण्याचे प्रयत्न हाती घेण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत गावात आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम सुरू होती. परंतु संशयितांचा मागमूस आढळून आला नाही.
Advertisement
Advertisement