प्रेमभंग झालेल्या व्यक्तींसाठी खास ऑफर
‘फसलेल्या प्रेमा’ला टॉयलेटमध्ये फ्लश करण्याची संधी
जगभरात चालू आठवड्यात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे. यावरून जगभरात अनेक प्रकारची तयारी करण्यात आली आहे. लोकांना वेगळा अनुभव देण्यासाठी अनेक मार्ग अवलंबिले जात आहेत. तर अनेक कंपन्या यादरम्यान कमाईची संधी साधत असुन अनेक ऑफर त्यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.
याचनुसार हू गिव्स एक क्रॅप नावाच्या कंपनीने व्हॅलेंटाइन डेनिमित्त लोकांना तुटलेल्या नात्याचा विसर पडावा म्हणून खास ऑफर दिली आहे. प्रेमात फसवणूक झालेल्या लोकांसाठी ही ऑफर असणार आहे. हू गिव्स अ क्रीप एक रिसायकल टॉयलेट पेपर कंपनी आहे, लोक या व्हॅलेंटाइन डेवेळी स्वत:ची फसवणूक करणाऱ्या प्रेमाला फ्लश करून स्वत:च्या संतापाला वाट मोकळी करून देऊ शकतात तसेच मूव्हऑन करू शकतात असे कंपनीचे म्हणणे आहे.
कंपनी लोकांना जुने लव्हलेटर्स, कार्ड्स, व्हॉट्सअॅप चॅटच्या प्रिंटआउटला टॉयलेट रोलमध्ये रुपांतरित करून विकत आहे, जेणेकरून लोक त्याचा वापर करून फ्लश करू शकतील आणि स्वत:च्या जुन्या आठवणीही पुसून टाकू शकतील.
कंपनीच्या ऑफरचे नाव ‘फ्लश योर एक्स’ आहे. तुम्हाला तुमच्या वाईट आठवणींच कप्प्यात पडलेली लव्हलेटर्स आम्हाला मेल करावी लागतील आणि आम्ही त्यांना प्रोक्शनपर्यंत पोहोचवू, जेथे आम्ही जादुई स्वरुपात त्यांना टॉयलेट पेपरमध्ये बदलणार आहोत, कारण अशा वाईट आठवणींना तेच योग्य स्थान असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ही कंपनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमधील स्वत:च्या पत्त्यावर पाठविण्यात आलेली लव्हलेटर्स स्वीकारत आहे, 29 फेब्रुवारीपर्यंत ती स्वीकारण्यात येणार आहेत.