विशेष पोलीस महानिरीक्षक दराडे आज रत्नागिरीत
रत्नागिरी :
कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे हे गुऊवारी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत़ यावेळी दराडे हे रत्नागिरी पोलिसांच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत़ तसेच नव्याने बांधण्यात येणाऱ्या जिल्हा पोलीस मुख्यालयाची इमारत, पोलीस वसाहत यांच्या कामाची पाहणीही दराडे हे करणार आहेत. दराडे यांच्या दौऱ्यानिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांची लगबग असल्याचे दिसत आह़े
दराडे यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार 6 मार्च रोजी सकाळी 7 वा. पोलीस कवायत मैदान येथे परेड होईल़ यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे परेडचे नेतृत्व करणार आहेत़ यानंतर पोलीस अधिकारी, अंमलदारांच्या तक्रारी, समस्यांविषयी दराडे चर्चा करणार आहेत़ तसेच यांनंतर मुख्यमंत्री यांच्याकडून 100 दिवसांचा कृती आराखडा तयार कऊन देण्यात आला होत़ा त्या कामाची पाहणी ते करतील़ तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय व विविध पोलीस ठाण्यांना भेट देवून त्या ठिकाणच्या कामाची पाहणी दराडे करतील, असे सांगण्यात आले.