शिक्षकेतर संघटनेच्या सिंधुदूर्ग जिल्हा पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान
संघटनेच्या चंद्रपूर येथील ५२ व्या राज्य अधिवेशनात गौरव
ओटवणे प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या चंद्रपूर - चिमूर येथे झालेल्या ५२ व्या राज्य अधिवेशनात गेल्यावर्षी सावंतवाडी येथे झालेल्या संघटनेच्या ५१ व्या अधिवेशनाच्या उत्तम नियोजनासह अलोट गर्दीमध्ये अधिवेशन यशस्वी केल्याबद्दल तसेच तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पाठपुरावा करून शिक्षकेतर संघटनेचे अनेक प्रलंबीत प्रश्न मार्गी लावल्याबद्दल संघटनेच्या सिंधुदूर्ग जिल्हा पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.या अधिवेशनाच्या व्यासपिठावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष अनिल माने, राज्य सहकार्यवाह शिवाजी खांडेकर, मोरेश्वर वासेकर, कोल्हापूर विभागीय तथा जिल्हा कार्यवाह गजानन नानचे, जिल्हा संघटक निलेश पारकर, बळीराम सावंत, लाडू जाधव, लक्ष्नण लोट आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष अनिल माने यांनी माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सहकार्याबद्दल विशेष आभार मानून या अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकेतर बांधव मोठ्या उपस्थित असल्याबद्दल समाधान विशेष कौतुक केले.यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे राज्य सहकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी गेल्यावर्षी सावंतवाडीत झालेल्या संघटनेच्या ५१ व्या अधिवेशनाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल संघटनेच्या सिंधुदूर्ग जिल्हा पदाधिकाऱ्यांचे कौतुक करीत गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली भरतीवर बंदी उठविण्यासह २४ वर्षाचा दुसरा लाभ तसेच अनुकंपा भरती,नवीन पेन्शन योजना आदी प्रश्न या अधिवेशनात तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून मंजूर करून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतर जिल्ह्यानी आदर्श इतर जिल्ह्याने घ्यावा असे आवाहन केले. या अधिवेशनात संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यवाह गजानन नानचे, जिल्हा संघटक निलेश पारकर, बळीराम सावंत, लाडू जाधव, लक्ष्नण लोट यांना शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.