गायक श्रीराम दिक्षीत यांचा खास सत्कार
वेंगुर्ले (वार्ताहर)-
शिरोडा येथील श्रीदेवी माऊली मंदिरात उत्कृष्ट भक्तीगीते सादर करण्याऱ्या गायक श्रीराम दिक्षीत यांचा खास सत्कार सहस्त्रचंडी अनुष्ठान मुंबई समितीचे अध्यक्ष महादेव उर्फ भाऊ आंदुर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्रीदेवी माऊली मंदिर, शिरोडा सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा समितीचे अध्यक्ष राजन शिरोडकर, देवस्थानचे विश्वस्त अशोक परब, यासह मान्यवर उपस्थित होते.शिरोडा येथील श्रीदेवी माऊली मंदिरात होणाऱ्या सहस्त्रचंद्र अनुष्ठान सोहळ्या अंतर्गत ब्राह्मण ऐक्यवर्धक संघ आरवली पंचक्रोशी यांच्यातर्फे आयोजित केलेल्या गायनाच्या कार्यक्रमात पंडित अजित कुमार कडकडे यांनी स्वरबद्ध केलेली भक्ती गीते सुप्रसिद्ध गायक श्रीराम दीक्षित यांनी उत्कृष्टपणे सादर केली या गीताने मंदिर व परिसर भाविक मंत्रमुग्ध झाला. उत्कृष्ट गायक असलेले श्रीराम दीक्षित रविंद्र पणशीकर आणि सहकारी यांनीही गीते उत्कृष्ट सादर केली.