For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईपीएफ पेन्शनधारकांना विशेष सुविधा

06:07 AM Sep 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
ईपीएफ पेन्शनधारकांना विशेष सुविधा
Advertisement

देशाच्या कुठल्याही बँकेतून मिळवू शकणार पेन्शन  : एक जानेवारीपासून लागू

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ईपीएफओच्या पेन्शन योजनेच्या कक्षेत येणारे पेन्शनधारक पुढील वर्षापासून कुठलीही बँक किंवा त्याच्या शाखेतून पेन्शन मिळवू शकणार आहेत अशी माहिती कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी दिली आहे. ईपीएस 1995 साठी एका केंद्रीकृत पेन्शन देयक प्रणालीच्या (सीपीपीएस) प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मांडविया हे ईपीएफओसाठी निर्णय घेणाऱ्या केंद्रीय न्यासी बोर्डाचे (सीबीटी) अध्यक्ष देखली आहेत.

Advertisement

सीपीपीएसमुळे पूर्ण देशात कुठलीही बँक किंवा कुठल्याही शाखेच्या माध्यमातून पेन्शनचे वितरण होऊ शकणार आहे. सीपीपीएसला मंजुरी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) आधुनिकीकरणाच्या दिशेने मैलाचा दगड आहे. याच्या अंतर्गत पेन्शनधारक देशात कुठल्याही बँक, कुठल्याही शाखेतून स्वत:ची पेन्शन प्राप्त करू शकणार आहे. दीर्घ काळापासून राहिलेल्या पेन्शनधारकांच्या समस्यांवर यामुळे तोडगा निघणार असल्याचा दावा मांडविया यांनी केला.

78 लाखाहून अधिक लोकांना लाभ

ईपीएफओला स्वत:च्या सदस्य आणि पेन्शनधारकांच्या गरजा उत्तमप्रकारे पूर्ण करण्यासाठी अधिक मजबूत, उत्तरदायी आणि तंत्रज्ञान-सक्षम संघटनेत बदलण्याच्या आमच्या प्रयत्नांच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सीपीपीएसमुळे ईपीएफओच्या 78 लाखाहून अधिक ईपीएस95 पेन्शनधारकांना लाभ होण्याची अपेक्षा आहे. केंद्रीकृत प्रणाली पेन्शन पेमेंट ऑर्डरला एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात स्थानांतरित करण्याच्या आवश्यकतेशिवाय पूर्ण देशात पेन्शनचे विनाअडथळा वितरण सुनिश्चित करणार आहे. सेवानिवृत्तीनंतर स्वत:च्या मूळ गावी राहण्यास जाणाऱ्या पेन्शनधारकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. ही सुविधा 1 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे.

Advertisement
Tags :

.