महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विशेष मुलांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात

10:12 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेक देम स्माईल व गायत्री अमिटीजचा उपक्रम

Advertisement

बेळगाव : मेक देम स्माईल फाऊंडेशन व गायत्री अमिटीज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मुलांसाठी ‘उम्मीद’ क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हिंडाल्को इंडस्ट्रीज, जयभारत फाऊंडेशन व प्रदीप होसमनी यांच्या सहकार्याने हा महोत्सव पार पडला. यामध्ये बेळगावमधील अंकुर, स्पर्श, आराधना, कार्मेल विद्याविकास, समर्थनम या विशेष मुलांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. इतर मुलांप्रमाणेच विशेष मुलांनाही क्रीडा स्पर्धांचा आनंद घेता यावा, यासाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील सर्वसाधारण विजेतेपद बैलहोंगल येथील कार्मेल विद्याविकास केंद्राने मिळविले. यामध्ये 70 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हिंडाल्को इंडस्ट्रीजचे अभिजीत बंडी, प्रदीप होसमनी, जयभारत फाऊंडेशनचे बसनगौडा पाटील, अनुष्का बंडी, विजय कुरणकर, प्रदीप त्रिपाठी यासह इतर उपस्थित होते. मेक देम स्माईल फाऊंडेशनच्यावतीने पॅरालिम्पिक स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील व्हिलचेअर बास्केटबॉल खेळाडू लता भोगण व लक्ष्मी रायण्णावर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्फराज खतीब, कलावती, साजी कुट्टी, प्रदीप पटेल यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article