For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेबीजच्या अटकावासाठी विशेष मोहीम

11:41 AM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
रेबीजच्या अटकावासाठी विशेष मोहीम
Advertisement

पशुसंगोपन खात्यामार्फत जागृतीला प्रारंभ : 15 सप्टेंबरपासून  प्रतिबंधक लसीकरण

Advertisement

बेळगाव : रेबीजला अटकाव करण्यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत सप्टेंबर महिन्यात विशेष मोहीम राबविली जाणार आहे. 1 ते 15 सप्टेंबर दरम्यान रेबीजबाबत जागृती आणि 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे. सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. 28 सप्टेंबर हा जागतिक रेबीज दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्यात ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. अलीकडे भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे खात्यामार्फत ही मोहीम अधिक तीव्रपणे राबविली जाणार आहे. शहरात 20 हजारहून अधिक भटकी कुत्री आहेत. तर जिल्ह्यात 76 हजारहून अधिक पाळीव कुत्र्यांची संख्या आहे. या सर्व  श्वानांना लस टोचली जाणार आहे. तत्पूर्वी शाळा आणि ग्रामपंचायत पातळीवर रेबीजबाबत जागृती मोहीम हाती घेतली जाणार आहे.

सप्टेंबर महिन्यात रेबीज पंधरवडा

Advertisement

खात्यामार्फत सप्टेंबर महिन्यात रेबीज पंधरवडा साजरा केला जाणार आहे. या अंतर्गत सर्व दवाखान्यातून प्रतिबंध लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. पाळीव श्वान आणि मांजरांना लस टोचली जाणार आहे. दरम्यान, शाळा आणि ग्रामपंचायत पातळीवर रेबीजचा प्रसार कसा होतो? आणि पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर कोणते उपचार घ्यावेत? याबाबतही जागृती केली जाणार आहे.

लसीकरणाचा पुरवठा

1 ते 15 सप्टेंबर दरम्यान रेबीजबाबत जागृती केली जाणार आहे. तर 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे. सर्व पशुवैद्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. शिवाय लसीकरणाचा पुरवठाही करण्यात आला आहे.

-डॉ. आनंद पाटील, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी.

Advertisement
Tags :

.