For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कान्समध्ये भारतीय लघुपटाला विशेष पुरस्कार

06:30 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
कान्समध्ये भारतीय लघुपटाला विशेष पुरस्कार
Advertisement

वृत्तसंस्था/ कान्स

Advertisement

फ्रान्समध्ये सध्या कान्स चित्रपट महोत्सवाची धूम सुरू आहे. तेथे भारतीय चित्रपटसृष्टीपासून हॉलिवूडमधील कलाकार रेड कार्पेटवर स्वत:च्या फॅशनची जादू दाखवत आहेत. मागील काही दिवसांमध्ये ऐश्वर्या रायपासून कियारा अडवाणी, जॅकलीन फर्नांडिस, दीप्ति सिधवानी आणि छाया कदम समवेत अनेक अभिनेत्रींनी कान्सच्या रेड कार्पेटवर वॉक केला. तर अनेक चित्रपटांचा प्रीमियर तेथे पार पडला आहे. 77 व्या कान्स चित्रपट महोत्सवात एफटीआयआयच्या लघूपटाने पुरस्कार मिळविला आहे.

चिदानंद एस. नाईक यांच्या ‘सनफ्लॉवर वेयर द फर्स्ट वन्स टू नो’ने सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी ‘ला सिनेफ का’चा पहिला पुरस्कार जिंकला आहे. भारतासाठी हे अत्यंत मोठे यश आहे. हा लघुपट कर्नाटकातील लोककथांवर आधारित आहे. ज्या कहाण्या ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो त्या यात मांडण्यात आल्या आहेत, असे चिदानंद नाईक यांनी म्हटले आहे. यापूर्वी 2020 मध्ये एफटीआयआयच्या अश्मिता गुहा नियोगी यांच्या ‘कॅटडॉग’ या लघुपटाने पुरस्कार मिळविला होता.

Advertisement

लघुपटाची कहाणी

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय कलाकृतीला पुरस्कार मिळाला असल्याचे म्हणत एफटीआयआयने आनंद व्यक्त केला आहे. या लघुपटात एका वृद्ध महिलेची कहाणी दर्शविण्यात आली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल फर्स्ट अवॉर्ड प्राप्त करणाऱ्याला 15 हजार युरो इतकी रक्कम प्राप्त होते.

Advertisement
Tags :

.