For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रकाश वेळीपांना सभापतींचे समन्स

12:20 PM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रकाश वेळीपांना सभापतींचे समन्स
Advertisement

वेळीपांच्या आरोपांवरुन गरजले तवडकर : आज हजर रहावे लागणार विधानसभेत

Advertisement

पणजी : माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनी विधानसभा अधिवेशन सुरू असताना आपणावर आरोप करून सभापती म्हणून आपल्या विशेषाधिकारांचा अपमान केला आहे, त्यामुळे वेळीप यांना विधानसभेत बोलावून जाब विचारणार आहे, असे निवेदन सभापती रमेश तवडकर यांनी काल शुक्रवारी केले. त्यानुसार सभापतींनी वेळीप यांच्यावर हक्कभंगाची कारवाई सुरू केली असून आज शनिवारी दुपारी विधानसभेत हजर राहण्यासंबंधी त्यांना समन्स जारी करण्यात आला आहे. सभापती तवडकर यांनी कोट्यावधी ऊपये खर्च करून काणकोण भागात विविध कार्यक्रम आयोजित केले. त्यांच्या शैक्षणिक संस्थांनाही कोट्यावधींचा निधी मिळाला आहे. हे सर्व कायदेशीर आहे की नाही, याची सरकारने चौकशी करावी अशी मागणी ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी गुऊवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. याच विषयावरून सभापती तवडकर यांनी शुक्रवारी प्रश्नोत्तर तास संपल्यानंतर सभागृहात वरील निवेदन केले. अधिवेशन सुऊ असताना वेळीप यांनी आपणावर आरोप केले आहेत. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. त्यामुळे सभापती म्हणून आपल्या विशेषाधिकारांचा अपमान झाला आहे. त्यासाठी वेळीप यांना शनिवारी दुपारी 3.30 वाजता सभागृहात बोलावून त्यासंबंधी जाब विचारणार आहे, असे तवडकर यांनी सांगितले.

प्रसारमाध्यमांना आवाह

Advertisement

प्रसारमाध्यमांना कोणतीही गोष्ट प्रसारित करण्यासाठी बंधन नाही. तरीही अशी बदनामीकारक विधाने छापण्यापूर्वी, प्रसारित करण्यापूर्वी त्यांनी विचार, शहानिशा करण्याची आवश्यकता असते. खास करून अधिवेशन सुरू असताना वृत्तांकन करताना सभागृहाचा अपमान होणार नाही, याची इलेक्ट्रॉनिक, प्रिन्ट, सोशल मीडिया यांनी खबरदारी, काळजी घेणे क्रमप्राप्त आहे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई आणि शिक्षाही होऊ शकते याची जाणीव ठेवावी, असे आवाहनही सभापतींनी केले आहे.

Advertisement
Tags :

.