अंतराळातही जिवंत राहतो स्पॅसबॅग
अंतराळवीरांसाठी ठरू शकतो धोकादायक
सुनीता विलियम्स सध्या 8 जणांच्या टीमसोबत आंतभारतीय वंशाच्या अंतराळवीर सुरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आहेत. तेथे अलिकडेच एका स्पेसबॅगचा शोध लागला आहे. या स्पेसबगने आता सुपरबगचे रुप धारण केले आहे, म्हणजेच त्यावर आता बॅक्टेरियल औषधे प्रभावी ठरणार नाहीत. अंतराळस्थानकावर असलेल्या अंतराळवीरांच्या प्रकृतीसाठी हे अत्यंत धोकादायक ठरू शकते. नासानुसार अंतराळ स्थानकात एंटेराबॅक्टर बुगन्डेंसिस नावाच्या बॅक्टेरियाचा शोध लागला आहे. हा बॅक्टेरिया पृथ्वीवर माती, गढूळ पाण्यासोबत मानवी आतड्यांमध्येही आढळून येतो. माणसांमध्ये याचे इंफेक्शन सर्वसाधारणपणे रुग्णालयात दाखल होणे किंवा एखाद्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने होते. यामुळे बॅक्टीरिमिया, सेप्टिक अर्थरायटिस, स्किन इंफेक्शन, आणि पोटाचे विकार होऊ शकतात. अंतराळस्थानकात आतापर्यंत बुगन्डेंसिस बॅक्टेरियाचे 13 स्टेन्स आढळून आले आहेत, म्हणजेच त्यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. अंतराळाच्या बंद वातावरणात वाढ करण्यासाठी त्यांच्यात अनेक म्युटेशन्स झाले, यामुळे पृथ्वीवरून आलेल्या बॅक्टेरियापेक्षा स्पेसबग अत्यंत वेगळा ठरला आहे. ड्रग रेजिस्टेंट असल्याने औषधांद्वारे यावर उपचार करणे सोपे ठरणार नाही.
हा बॅक्टेरिया अंतराळात म्युटेट होत विकसित झाला असला तरीही तो पृथ्वीवरूनच तेथे पोहोचला आहे. पूर्ण खबरदारी घेऊनही अंतराळ स्थानकावर अंतराळवीर किंवा रॉकेटद्वारे बग्स पोहोचत असतात. अंतराळ स्थानकावर वातावरण अत्यंत नियंत्रित असते, तेथे गुरुत्वाकर्षणही नसते, सोलर रेडिएशनही अधिक असते, तसेच कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण अधिक असते. तरीही जर एखादा बग जिवंत राहिल्यास ती मोठी गोष्ट आहे. अंतराळ स्थानकात पूर्वीही लोक आजारी पडत राहिले आहेत. 1968 साली अपोलो 7 मध्ये पहिले प्रकरण समोर आले हेते, तेव्हा अंतराळवीर वेली स्चिरा यांना तीव्र डोकेदुखीसोबत सर्दी झाली होती. काही तासांमध्येही ही लक्षणं सर्वांमध्ये दिसू लागली होती.
अंतराळात अधिक आजारी
अंतराळात पाठविण्यापूर्वी अंतराळवीरांना मोठे प्रशिक्षण मिळते, ते पूर्णपणे आरोग्यदायी असतील तरच त्यांना मोहिमेवर पाठविले जाते. तरीही अंतराळात अंतराळवीर अधिक आजारी पडतात. अंतराळवीरांमध्ये सर्दी, गळा खराब होणे, त्वचेवर पुरळ उठणे किंवा अशाप्रकारची अॅलर्जी निर्माण होते, जी पृथ्वीवर दिसून येत नाही. हे का घडते याचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही. नासाचा ह्युमन रिसर्च प्रोग्राम सध्या संशोधन करत आहे.
मेंदूवरही पडतो प्रभाव
अंतराळात मेंदूवरही प्रभाव पडत असतो. हा प्रभाव समजून घेण्यासाठी विशेष तंत्रज्ञान तयार झाले असून त्याला टॅक्टोग्राफी नाव मिळाले आहे. हे ब्रेन इमेजिंग तंत्रज्ञान असून ते न्यूरॉन्समध्ये किरकोळ बदलही दर्शविते. अंतराळात पोहोचल्यावर तेथील अत्यंत धोकादायक रेडिएशनपासून वाचण्यासाठी मेंदू वेगळ्याप्रकारे काम करू लागतो, याला न्यूरोप्लासिसिटी म्हटले जाते. अंतराळाच्या तीव्र स्थितीमुळे मेंदू वेगळ्या प्रकारे वागू लागतो. तेथे शरीराचा भार संपुष्टात येतो, यावर नियंत्रणासाठी मेंदू वेगळे संकेत देतो, हे संकेत अनेक महिन्यांपर्यंत मिळत राहतात. मेंदूच्या री-वायरिंगसाठी इतका वेळ पुरेसा आहे. पृथ्वीवर परतल्यावर अंतराळवीर चालताना आणि संतुलन साधताना अडखळू लागतात. तसेच त्यांच्या कॉग्निटिव्ह स्कीलवर प्रभाव पडतो. तसेच बोलतानाही त्यांना समस्या निर्माण होते.