संरक्षण विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ‘स्पर्श’ कार्यक्रम यशस्वी
बेळगाव : संरक्षण विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ‘स्पर्श’ हा विशेष कार्यक्रम मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या (एमएलआरसी) शर्कत सभागृहामध्ये बुधवार दि. 20 रोजी झाला. यामध्ये संरक्षण विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या सुविधांची माहिती देण्यात आली. निवृत्ती वेतनासाठी नोंदणी करणे, निवृत्ती वेतनातील फरक यासारख्या तक्रारी जाणून घेण्यासाठी विशेष कक्ष (काऊंटर) यावेळी स्थापन करण्यात आला. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, कर्नल सी. रामनाथकर यांनी मार्गदर्शन केले. ‘स्पर्श’ अंतर्गत कोणत्याही तक्रारी असल्यास त्या दूर करण्यासाठी आपण मदत करू, असे जिल्हाधिकारी म्हणाले. त्यानंतर रामनाथकर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद जाणून घेत पीसीडीएच्या बेंगळूर पथकाने 15 डिसेंबर रोजी एमएलआयआरसीमध्ये होणाऱ्या रॅलीचे प्रतिनिधीत्व करू, असे आश्वासन दिले.